शेतकऱ्यांनो! सततच्या ढगाळ वातावरणामुळे कापूस, सोयाबीनवर पडू शकते कीड?, कीड नियत्रंणासाठी तज्ज्ञांचा हा सल्ला नक्की वाचा

Published on -

सध्य परिस्थितीत वातावरणातील तापमान २३ ते ३० अंश सेल्सिअस, आर्द्रता ७५ ते ८२, ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाउस, असे असल्याने खरीपात पेरणी झालेली सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी सारख्या पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची श्यक्यता आहे. तेव्हा पीक संरक्षणाचे उपाय वेळीच केले, तर पीक कीड व रोग मुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त होईल.

कापूस- बागायती कापूस १.५ ते २ महिने वयाचा तर कोरडवाहू कापूस १ ते १.२५ महिने वयाचा आहे. या पिकावर सध्याच्या वातावरणात मावा, तुडतुडे, हवामान कोरडे होताच पांढरी माशी आणि फुल किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून निंबोळी अर्क ५% ची फवारणी करावी. त्यानंतर फ्लोनीकॅमिड ५ डब्ल्यू जि २ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

पावसाची उघडीप मिळताच पिवळे चिकट सापळे २५ प्रती एकर प्रमाणे लावावे.
कपाशीवरील गुलाबी बोंड आली व्यवस्थापनासाठी झुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. गंध सापळे ८ ते १० प्रती एकरी लावावेत. २० ते २५ पक्षी थांबे उभारावेत. जाविक उपायासाठी शेतात लेडी बर्ड बीटल, भुंगेरे, क्रायसोपर्ला किवा तत्सम कीटक ओळखून त्यांचे संवर्धन करण्यासाठी उपाय करावेत आणि रासायनिक कीटक नाशक फवारणीचा टाळावे.

सोयाबीन- सोयाबीन पिकावर रस शोषक किडी बरोबरच पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी शेतात गंध सापळे लावावेत, निंबोळी अर्क ५० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी तसेच गरज वाटल्यास अॅसिटामिप्रीड २५% + बाय्फेन्थ्रीन २५ % डब्ल्यू जि ५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

तूर पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास अझाडीरेक्टीन ०.०३% (३०० पीपीएम ५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी.

मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास ट्रायकोडर्मा २ लिटर + सुडोमोंस २ लिटर + चांगले कुजलेले शेणखत २५ ते ५० किलो मिसळून जमिनीतून घालावे.

मूग, उडीदवर माव्याच्या प्रादुर्भावाची शक्यता…

सततच्या ढगाळ हवामानाचा मूग, उडीद या पिकावरही परिणाम होऊ शकतो. या दोन्ही पिकांवर रस शोषक किडी प्रामुख्याने काळा / हिरवा मावा किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत असल्यास निंबोळी अर्क ५% किवा क्विनॉलफॉस २५% इसी २ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!