अंतराळ म्हणजे आपल्यासाठी एक रहस्यमय आणि रोमांचक जागा. तिथे ना हवा असते, ना आवाज ऐकू येतो, ना मोबाईल टॉवर असतात आणि ना इंटरनेट. तरीसुद्धा, अंतराळात असलेले अंतराळवीर आपल्या पृथ्वीवरच्या लोकांशी थेट बोलू शकतात, व्हिडीओ कॉल करू शकतात, आणि आपले अनुभव शेअरही करू शकतात. हे ऐकून मनात सहजच प्रश्न निर्माण होतो की, तिथे मोबाईल नाही, नेटवर्क नाही, तर मग हे शक्य कसं होतं?

याचं श्रेय जातं अत्याधुनिक विज्ञान आणि नासासारख्या संस्थांच्या अफाट कल्पनाशक्तीला. अवकाश म्हणजे पूर्णपणे निर्वात क्षेत्र इथे ध्वनी तर सोडा, रेडिओ लाटा सुद्धा सरळ पोहोचत नाहीत. अशा कठीण परिस्थितीतही वैज्ञानिकांनी असे तंत्रज्ञान विकसित केलं आहे, जे पृथ्वीपासून कोट्यवधी मैलांवर असलेल्या अंतराळयानांशीही संवाद साधू शकतं.
नासाचे तंत्रज्ञान
नासाने जगभरात सात खंडांवर उभारलेले 230 फूट उंच अँटेना हेच या संपूर्ण प्रणालीचे खरे नायक आहेत. हे प्रचंड अँटेना अंतराळातील 200 कोटी मैल दूर असलेल्या अंतराळयानांपर्यंत संदेश पोहोचवण्यास सक्षम आहेत. अंतराळवीर जेव्हा पृथ्वीवर संदेश पाठवतात, तेव्हा त्यांचा आवाज एका विशिष्ट डिजिटल कोडमध्ये रूपांतरित केला जातो. हा कोड मग ग्राउंड स्टेशनवर असलेल्या रिसीव्हरपर्यंत पोहोचतो आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात रूपांतरित होतो. ही सगळी प्रक्रिया केवळ काही सेकंदांत पार पडते, जी ऐकताना जादूसारखी वाटते.
हे सिग्नल थेट येत नाहीत, तर त्यांच्या वाटेत काही खास उपग्रह असतात, ज्यांना रिले सॅटेलाइट्स म्हटलं जातं. हे उपग्रह अवकाशात कायम फिरत असतात आणि अंतराळयान व पृथ्वीतील अँटेना यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात. त्यांची भूमिका म्हणजे एकही संवाद हरवू न देता योग्य वेळेला आणि योग्य ठिकाणी सिग्नल पोहोचवणे.
लेसर कम्युनिकेशन प्रणाली
याच तंत्रज्ञानाला अजून प्रगत बनवण्यासाठी नासाने आता लेसर कम्युनिकेशन प्रणालीवर काम सुरू केलं आहे. इथे रेडिओ लाटांऐवजी प्रकाशाचा वापर करून डेटा ट्रान्सफर केला जातो. हा डेटा सध्याच्या रेडिओ सिग्नलपेक्षा तब्बल 100 पट वेगाने पाठवता येतो. म्हणजे भविष्यात, फक्त काही क्षणात प्रचंड प्रमाणात माहिती पृथ्वीवर पोहोचू शकेल.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, या क्षेत्रात भारतही आता आपला ठसा उमटवत आहे. इस्रोने स्वतःचं डीप स्पेस नेटवर्क तयार करण्याची योजना आखली आहे. जेव्हा भारतीय अंतराळवीर चंद्रावर किंवा इतर ग्रहांवर जातील, तेव्हा ते देखील आपल्या देशाशी थेट संवाद साधू शकतील. यामुळे भारताची तांत्रिक ताकद जागतिक पातळीवर अधिक भक्कम होईल.