‘हा’ आहे भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा ! लोक अगदीच राजा – महाराजा सारखे आयुष्य जगतात, प्रत्येक घरातील एक व्यक्ती धनवान

भारतातील एकूण 806 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक श्रीमंत जिल्हा कोणता ? याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

India’s Richest District : भारतात एकूण 806 जिल्हे आहेत, महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. राज्यात 2014 पर्यंत 35 जिल्हे होते मात्र 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि एक नवीन जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा अस्तित्वात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी सुद्धा उपस्थित होत आहे.

यामुळे आगामी काळात राज्यातील जिल्ह्यांची संख्या आणखी वाढू शकते. खरंतर महाराष्ट्रात अनेक श्रीमंत जिल्हे आहेत. मुंबई, पुण्यासारख्या जिल्ह्यांमध्ये अनेक श्रीमंत उद्योगपती अस्तित्वात आहेत. पण तुम्हाला भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा कोणता याची माहिती आहे का? नाही.

मग आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर अनेकांना मुंबई हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा असेल असे वाटत असेल पण तसे नाही. भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा हा महाराष्ट्रात नसून राजस्थान मध्ये आहे.

हा आहे भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा 

मीडिया रिपोर्ट नुसार राजस्थान मधील जयपूर हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुंबई जशी महाराष्ट्राची राजधानी आहे तशीच जयपूर ही राजस्थानची राजधानी असून हा जिल्हा देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा म्हणून ओळखला जातो.

या जिल्ह्यात श्रीमंत लोकांचा मोठा वावर असून पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही या जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळालेली आहे. जयपुरला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते आणि येथे जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

हा भारतातील सर्वाधिक कमी गरीबी दर असणारा जिल्हा असल्याचे नीती आयोगाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जयपूरमधील लोक अगदीच राजा – महाराजांसारखे राजेशाही जीवन जगतात. येथील जीवनशैली, खाद्य संस्कृती आणि कपडे हे इतर राज्यांपेक्षा वेगळे आहेत. 

पर्यटनामुळे जिल्ह्याचा झालाय मोठा विकास 

जयपूर जिल्ह्याचा विकास येथील पर्यटनामुळे झालाय. येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. येथील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. हे शहर आणि जिल्हा आपली रंगीबेरंगी संस्कृती आणि शतकानुशतके जुन्या इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.

जयपूर हे राजस्थानच्या संस्कृतीचे आणि वारशाचे केंद्रबिंदू आहे. येथील राजवाडे आणि त्यांचे सौंदर्य लोकांना विशेष आकर्षित करते. या जिल्ह्याने अनेक राजांचे राज्य पाहिले आहे. यामुळे इतिहासाच्या पानांमध्ये जयपूरचे नाव सुवर्णाक्षराने नोंदवण्यात आले आहे. जयपूरमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला जगात इतर कुठेच सापडणार नाहीत.

इथे हवा महल आहे जी की जगातील एकमेव इमारत आहे जी हव्यावर तरंगते म्हणजेच कुठल्याही पायाच्या आधाराविना ही वास्तू उभी आहे. ही इमारत वास्तुकलेचा असा एक अद्भुत नमुना आहे, जी गुलाबी वाळूच्या दगडापासून बनलेली आहे. याच कारणामुळे जयपूरला पिंक सिटी असे नाव पडले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!