90% लोक करतात ही चूक! सकाळी गरम पाणी प्यावं की थंड?, आरोग्यासाठी फायदेशीर काय जाणून घ्या

Published on -

सकाळी उठल्यावर पाणी पिणे ही आपल्यापैकी बऱ्याच लोकांची रोजची सवय असते. पण या साध्याशा वाटणाऱ्या कृतीमागे एक गुंतागुंतीचं विज्ञान आहे, ज्याची फार थोड्यांना कल्पना असते. पाणी गरम प्यावं की थंड? कोणता पर्याय शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे? हा प्रश्न खरंतर 90% लोकांच्या मनात असतो, पण त्याचं योग्य उत्तर फारच थोडे लोक देऊ शकतात. कारण आपल्याला पाणी प्यायचं असतं हे बऱ्याच जणांना माहिती नसते.

आपल्या शरीराचा जवळपास 55 ते 78 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो. म्हणूनच पाणी केवळ तहान भागवण्यासाठी नाही, तर शरीरातील प्रत्येक अवयवाच्या कार्यासाठी गरजेचं असतं. सकाळी उठून पाणी पिणं ही सवय शरीराला चालना देण्याचं एक उत्तम साधन आहे. काही लोक रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतात आणि सकाळी उठताच ते पितात, तर काहीजण कोमट पाणी प्यायला प्राधान्य देतात. काही मात्र अजूनही थेट फ्रिजचं थंड पाणी पिणं हेच फ्रेशनेसचं लक्षण मानतात. पण नेमकं कोणतं योग्य?

ऋतूनुसार पाणी पिणे योग्य

याचं खरं उत्तर आहे, ऋतूनुसार आणि शरीराच्या गरजेनुसार निर्णय घ्या. उन्हाळ्याच्या दिवसात थोडं थंडसर पाणी प्यायल्याने शरीर थंड राहतं, आणि दिवसभर ताजेपणा जाणवतो. पण थंडीच्या दिवसांत गरम, म्हणजे कोमट पाणी हे पचनासाठी, शरीर गरम ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अधिक फायदेशीर असतं. ज्यांना सतत सर्दी, खोकला किंवा पचनाच्या तक्रारी असतात, त्यांच्यासाठी तर कोमट पाणी ही रामबाण औषधच ठरू शकतं.

 

पण केवळ पाणी गरम की थंड हेच महत्त्वाचं नाही, ते कसं पिताय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. शरीरशास्त्र सांगतं की असं केल्याने पाण्याचा प्रवास गोंधळात टाकतो, आणि त्यामुळे हळूहळू सांधेदुखी, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. बसून, शांतपणे, छोटे छोटे घोट घेत पाणी प्यायल्याने शरीराला त्याचा योग्य फायदा होतो.

पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळून प्या

पाण्यात विविध पदार्थ मिसळून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या आजकाल वाढली आहे. लिंबू, हळद, मध, आल्याचं पाणी हे उपाय काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतात. पण कोणतीही सवय शरीरावर दीर्घकाळ परिणाम करते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सवयीने केवळ वजनच नाही, तर संपूर्ण आरोग्य नियंत्रित करता येतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!