Property Rights : अलीकडे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सरकारकडून महिलाच्या नावाने मालमत्ता खरेदी झाल्यास टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. महिलांच्या नावाने घर खरेदी वाढावी तसेच फ्लॅट, जमीन, प्लॉट अशा मालमत्तेची खरेदी वाढावी अनुषंगाने सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सूट देण्यात आली आहे.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी देखील सरकारने हे पाऊल उचललेले आहे. हेच कारण आहे की अनेक जण आपल्या पत्नीच्या नावाने घर किंवा इतर मालमत्तेची खरेदी करतात. अनेकजण पत्नीच्या नावाने घर, गाडी , जमीन, प्लॉट, फ्लॅट याची खरेदी करतात आणि स्टॅम्प ड्युटी मध्ये हजारो रुपयांची बचत करतात.

पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की जर पत्नीच्या नावाने मालमत्तेची खरेदी झालेली असेल आणि ती खरेदी पतीने स्वतःच्या पैशाने केलेले असेल तर अशा प्रकरणांमध्ये सदर मालमत्तेचा खरा मालक कोण? दरम्यान आता याच संदर्भात माननीय हायकोर्टाकडून महत्त्वाचा निकाल समोर आला आहे.
हायकोर्टाचा निकाल काय सांगतो?
पत्नीच्या नावावर असणारी मालमत्ता जर तिने स्वतःच्या कमाईने खरेदी केलेली नसेल तर अशी मालमत्ता कोणाची? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होत होता. दरम्यान माननीय अलाहाबाद हायकोर्टात देखील अस एक प्रकरण आलं होतं.
दरम्यान या प्रकरणाची सुनावणी करताना माननीय अलाहाबाद हायकोर्टाने पत्नीच्या नावावर असणारी मालमत्ता धरतीने स्वतःच्या कमाईने खरेदी केलेली नसेल तर ती मालमत्ता कुटुंबाची मालमत्ता समजली जाईल असा महत्त्वाचा निकाल दिला आहे.
खरेतर, भारतीय कायद्यानुसार पत्नीला स्वतःचे उत्पन्न असल्याचे सिद्ध करता आले नाही, तर तिच्या नावावरील मालमत्ता पतीच्या उत्पन्नातून मिळवलेली मानली जाते आणि मग अशा संपत्तीवर कुटुंबातील सर्वच सदस्यांचा अधिकार असतो.
महत्त्वाची बाब अशी की अशा प्रकरणांमध्ये मालमत्ता विकण्याचा, लिलाव करण्याचा किंवा दान करण्याचा अधिकार पत्नीला नसतो. पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला संबंधित मालमत्ता विकता येत नाही किंवा लिलाव करता येत नाही तसेच ती मालमत्ता दानही देता येत नाही.
एकंदरीत जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तिच्या नावाने घर फ्लॅट सोनं जमीन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर काळजीपूर्वक निर्णय घ्या. कारण की तुमच्या पत्नीच्या नावावर जर तुम्ही मालमत्ता खरेदी केली तर ती मालमत्ता कौटुंबिक मालमत्ता समजली जाईल ( पतीच्या पैशाने खरेदी केलेली मालमत्ता असेल तर).
पतीच्या संपत्तीवर पत्नीला अधिकार मिळतो का ?
कायद्यानुसार पत्नीला पती जिवंत असताना त्याच्या संपत्तीवर अधिकार मिळत नाही. मात्र पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला तिच्या मुलांएवढाच मालमत्तेत अधिकार मिळतो. पतीने मृत्युपत्र केले नाही तर पत्नीला मालमत्तेचा काही हिस्सा मिळू शकतो. पण, पत्नी मालमत्ता विकू शकत नाही किंवा तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकत नाही.