Ahilyanagar News : गर्भवती विवाहिता मुलासह शेततळ्यात मृतावस्थेत ! अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील घटना

Published on -

राहुरी तालुक्यातील गुहा येथील सहा महिन्याची गर्भवती असलेल्या विवाहितेसह पाच वर्षाचा मुलगा शेततळ्यात मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान या घटनेबाबत शासकीय यंत्रणेस माहिती न देता मृतदेहांचे शवविच्छेन न करता हिंदू धर्माच्या रीतिरिवाजपणे अंत्यसंस्कार विधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती व सासू सासरे व नातेवाईकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय रामभाऊ बारहाते, (रा.सडे, ता. कोपरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत म्हटले की, दिनांक ७ जुलै रोजी रात्री फोन आला, त्यावेळी सांगितले की, ऋषाली व मुलगा अंश हे गुहा येथील घराच्या पाठीमागील शेततळ्यामध्ये मयत अवस्थेत आढळून आले आहे. मुलगी ऋषाली व अंशु यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले नाहीत. तसेच त्यांचे प्रेत घराचे बाहेर असून त्याच स्थीतीमध्ये ठेऊन मृतदेहावर हिंदू धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे कोणतेही विधी न करता अप्रतीष्ठा केली.

तसेच त्यांच्या मरणाबाबत शासकीय विभागास कळवणे गरजेचे असतानाही ऋषाली हिचे सासरे रविंद्र कोळसे, पती हरिभाऊ कोळसे, सासू शारदा कोळसे व इतर नातेवाईकांनी हेतूपरस्पर कळविले नाही. दोन्ही मृतदेहावर गुहा गावातील स्मशभूमीमध्ये परस्पर अंत्यसंस्कार केले असे फिर्यादीत म्हटले आहे. संजय बारहाते यांनी सोमवारी राहुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून रविंद्र कोळसे, हरिभाऊ कोळसे, शारदा कोळसे व इतर नातेवाईक यांच्यावर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!