स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करोडो ग्राहकांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ही बातमी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खास ठरणार आहे. कारण की बँकेकडून पुन्हा एकदा फिक्स डीपॉझिटच्या व्याजदरात बदल करण्यात आला आहे.

Published on -

SBI News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. याच एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. आरबीआय ने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आणि या निर्णयानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया कडूनही आपल्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. 

एसबीआय कडून आज 15 जुलै 2025 रोजी आपल्या काही अल्प कालावधीच्या एफडी योजनांच्या व्याजदरात 15 बेसिस पॉइंट पर्यंतची कपात करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण एसबीआयने कोण – कोणत्या FD योजनांचे व्याजदर कमी केले आहेत याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या FD योजनांचे व्याजदर झालेत कमी 

एसबीआयने आज 15 जुलै 2025 रोजी अल्पकालावधीच्या तीन एफडी योजनांचे व्याजदर कमी केले आहेत. ही कपात सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक दोघांसाठीही लागू राहणार असे देखील बँकेच्या निवेदनातून स्पष्ट झाले आहे.

एसबीआय ने 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर सामान्य नागरिकांसाठी 5.05 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत म्हणजेच यामध्ये 15 बेसिस पॉइंटची कपात करण्यात आली आहे.

तसेच 180 दिवसांपासून ते 210 दिवसांच्या एफडी वरील व्याजदर आता सामान्य नागरिकांसाठी 5.65 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत, आधी हा दर 5.80% एवढा होता. याशिवाय, 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर आता 5.90 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत, आधी हा रेट 6.05% इतका होता.

नवीन रेट कधीपासून लागू होणार?

स्टेट बँक ऑफ इंडियाने तीन अल्पकालावधीच्या एफडी योजनांचे व्याजदर कमी केले असून हे नवीन व्याजदर आजपासून अर्थातच 15 जुलै 2025 पासून लागू राहणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. एसबीआय आता आपल्या सामान्य नागरिकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडी साठी 3.05% पासून ते 6.45% दराने व्याज देणार आहे.

मात्र ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा 0.50% अधिकचे व्याज मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षे कालावधीच्या एफडीवर 3.55% ते 7.05% दराने व्याज मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!