पावसात वाढतो ‘क्रेट’चा सुळसुळाट! सापांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, जाणून घ्या

Published on -

निसर्गाच्या अद्भुततेबद्दल आपण अनेकदा ऐकतो, पण काही गोष्टी इतक्या धक्कादायक असतात की त्यांचा विचारही अंगावर काटा आणतो. असाच एक साप आहे. दिसायला सामान्य, पण स्वभावाने अत्यंत धोकादायक. त्याचं नाव ‘क्रेट’. भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणारा हा साप आपल्या गुप्त आणि शांत हल्ल्यामुळे ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. अनेक वेळा माणसाला हेही कळत नाही की त्याला चावलं आहे… आणि थोड्याच वेळात मृत्यू ओढावतो.

क्रेट साप

क्रेट हा साप दिवसापेक्षा रात्री अधिक सक्रिय असतो. तो बहुतेक वेळा आपल्या शिकाराकडे सावधपणे, कुठलाही आवाज न करता जातो. तो इतका थंड आणि गूढ स्वभावाचा आहे की तो सरळ चावत नाही. उलट, माणसाच्या शरीराला चिकटतो आणि उष्णता घेतो. माणसाचे शरीर त्याच्यासाठी गरम ऊर्जा मिळवण्याचा स्रोत बनते. काही वेळ असंच शांतपणे चिकटून राहिल्यानंतर तो चावतो, पण चावल्यावर वेदना होत नाहीत. आणि याच गोष्टीमुळे क्रेट साप सर्वात घातक ठरतो.

ज्यांना तो चावतो, त्यांना काहीच कळत नाही. शरीर बधीर व्हायला लागतं, श्वासोच्छवास मंद होतो आणि काही तासांतच शरीर पूर्णपणे काम करेनासं होतं. डॉक्टरांकडे पोहोचण्याआधीच अनेकांच्या शरिरात विष इतकं पसरलेलं असतं की काहीच करता येत नाही. दुर्दैव म्हणजे, अनेकदा हे सर्व झोपेत घडतं, आणि झोपेतच मृत्यू होतो.

भारतात विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत क्रेट साप अधिक सक्रिय असतो. ग्रामीण भागांमध्ये याच्या हल्ल्याच्या बातम्या दरवर्षी ऐकायला मिळतात. मोकळ्या खिडक्या, झोपताना उघड्या राहणाऱ्या घराच्या दरवाज्यांमधून तो घरात येतो. बेडमध्ये झोपलेल्या माणसाच्या जवळ जातो, त्याच्या शरीराची उष्णता घेतो आणि नंतर चावतो.

स्वतःचं संरक्षण कसं कराल?

अशा धोकादायक सापांपासून संरक्षण करायचं असेल, तर काळजी घेणं आवश्यक आहे. झोपताना बेड तपासणं, घरात दररोज फिनाइल किंवा सापांना नको असलेले वास फवारणं, घर बंद ठेवणं, ही साधी पण महत्त्वाची पावलं आहेत. सापांचं अस्तित्व टाळणं कठीण असलं, तरी आपली जागरूकता आणि सवयी त्यांच्यापासून बचावासाठी उपयुक्त ठरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!