गरोदरपणाचे पहिले 3 महिने हे प्रत्येक स्त्रीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूपच नाजूक आणि संवेदनशील काळ असतो. आई होण्याची गोड भावना असली, तरी अनेक शंका, भीती आणि शारीरिक बदलांनी स्त्री बिचकते. या काळात गर्भाचा पाया तयार होतो आणि बाळाच्या विकासासाठी पोषणदृष्ट्या योग्य अन्न घेणे अत्यंत गरजेचे असते. पण काही अन्नपदार्थ असे असतात की जे पहिल्या तिमाहीत घेतल्यास गर्भवती स्त्रीच्या आणि गर्भाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे त्या गोष्टी वेळेवर ओळखून टाळणे खूप महत्त्वाचे आहे.

‘हे’ अन्नपदार्थ टाळा
या काळात पहिल्यांदा टाळायची गोष्ट म्हणजे फास्ट फूड. या प्रकारच्या अन्नात पोषक घटक नसतात आणि ते शरीरात फक्त फॅट्स, सॉल्ट आणि केमिकल्स भरतात. त्यामुळे बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त पोषण मिळत नाही. दुसरीकडे, चहा आणि कॉफीमधील कॅफिन हा गर्भवतीसाठी एक मोठा धोका ठरू शकतो. यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो आणि नवजात बाळाचे वजन कमी होऊ शकते.
कच्चे अंडे खाल्ल्यामुळे साल्मोनेला नावाच्या जीवाणूचा संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे उलटी, जुलाब होण्याची शक्यता वाढते. अजिनोमोटो (MSG) हा रासायनिक पदार्थ चायनीज पदार्थांमध्ये वापरला जातो आणि त्याचा गर्भातील मेंदूच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो.
अल्कोहोल चुकुनही घेऊ नका
कोंबडीमध्ये अनेक वेळा बॅक्टेरिया आढळतात, जे गर्भवती स्त्रीच्या रोगप्रतिकारशक्तीला त्रास देतात. त्यामुळे या काळात चिकन खाऊ नये. याचप्रमाणे, कच्ची पपई हे फळ बाळासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यातील एंजाइम्स गर्भाशय आकुंचनाला कारणीभूत ठरू शकतात. शेवटी, अल्कोहोलचे सेवन तर थेट गर्भपात, मृत बाळ जन्म आणि मेंदूविकासाच्या समस्यांशी जोडले जाते.
आई होण्याच्या या सुंदर प्रवासात स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे हे सर्वात मोठे कर्तव्य असते. त्यामुळे अशा धोकादायक अन्नपदार्थांपासून दूर राहणे हेच योग्य.