अंबानीसह पुण्यातील ‘या’ व्यक्तीकडे आहे प्रायव्हेट विमान ! भारतात किती लोकांकडे आहे प्रायव्हेट विमान? पहा संपूर्ण यादी

सुरक्षित आणि जलद देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी गडगंज श्रीमंत लोक विमान प्रवासाला प्राधान्य देतात. तर काही असे श्रीमंत आहेत जे की स्वतःच्या प्रायव्हेट विमानाने प्रवास करतात. दरम्यान आज आपण देशातील किती लोकांकडे प्रायव्हेट विमान आहेत याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Pune News : प्रवासासाठी विमान, रेल्वे आणि बस हे सार्वजनिक वाहतुकीचे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. सर्वसामान्य जनता रेल्वे आणि बसने प्रवास करण्याला प्राधान्य दाखवते कारण की हा प्रवास त्यांच्या खिशाला परवडणारा आहे. पण अनेक श्रीमंत व्यक्ती तसेच उद्योगपती विमान प्रवासाला प्राधान्य दाखवतात.

विमानाचा प्रवास हा जलद होतो आणि जगातील कोणत्याही कोपऱ्यात विमानाने सहज जाता येते. भारतात अनेक खाजगी कंपन्यांच्या विमानसेवा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. या विमान सेवांच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करता येतो.

पण भारतात असेही काही गडगंज श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे स्वतःचे विमान आहे, हो देशातील काही श्रीमंत लोकांकडे प्रायव्हेट विमान म्हणजेच प्रायव्हेट जेट आहे ज्यातून ते कुठेही प्रवास करू शकतात.

महत्त्वाची बाब अशी की भारतातील ज्या गडगंज श्रीमंत लोकांकडे स्वतःचे विमान आहे त्या लोकांमध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि पुण्यातील एका श्रीमंत व्यक्तीचा समावेश होतो.

भारतात दहापेक्षा जास्त श्रीमंत लोकांकडे स्वतःचे प्रायव्हेट विमान आहे. अशा परिस्थितीत आता आपण देशातील कोणत्या श्रीमंत व्यक्तींकडे प्रायव्हेट विमान आहे याची माहिती पाहणार आहोत.

या श्रीमंतांकडे आहे प्रायव्हेट विमान 

भारतातील काही बड्या उद्योगपतींकडे प्रायव्हेट जेट आहे यासोबतच काही अभिनेत्यांकडे आणि राजकारण्याकडे देखील स्व मालकीचे प्रायव्हेट जेट आहे. भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालयाने भारतात किती खाजगी विमाने आहेत याची माहिती दिली आहे.

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतात 550 हून अधिक खाजगी विमाने अस्तित्वात आहेत. यामध्ये खाजगी जेट आणि हेलिकॉप्टरचा समावेश असल्याची माहिती महासंचालनालयाकडून देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार देशातील फक्त आठ श्रीमंत उद्योगपतींकडे प्रायव्हेट जेट आहे.

नवीन जिंदाल, पुण्यातील सर्वात श्रीमंत उद्योगपती सायरस पुनावाला यांचा मुलगा आदर पूनावाला, कलानिधी मारन, गौतम अदानी, लक्ष्मी मित्तल, पंकज मुंजाल, अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी या उद्योगपतींचा या यादीत समावेश होतो.

भारतातील गडगंज श्रीमंत उद्योगपतींसह प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींकडेही स्वतःचे प्रायव्हेट जेट असल्याची माहिती समोर आली आहे. किंग खान म्हणजे शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, भाईजान म्हणजे सलमान खान आणि इतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींकडे प्रायव्हेट जेट असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून हाती आली आहे. 

सर्वाधिक महागडे प्रायव्हेट जेट कोणाकडे?

देशातील सर्वाधिक महागडे प्रायव्हेट जेट आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. अंबानीकडे तब्बल सहाशे कोटी रुपये किंमत असणारे बोईंग बिझनेस 2 जेट हे विमान आहे. प्रायव्हेट जेट ची किंमत ही 16 कोटी रुपयांपासून सुरू होऊ शकते.

मात्र सरासरी प्रायव्हेट जेट ची किमान किंमत 20 कोटी रुपये इतकी आहे. पण प्रायव्हेट जेट ची किंमत 100 कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकते. याशिवाय मुकेश अंबानी यांच्याकडे असणारे प्रायव्हेट विमान सारखे महागडे जेट सुद्धा आहेतच.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!