पातळ, आकर्षक आणि फीचर्सने भरलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर इन्फिनिक्स लवकरच सादर करणार असलेला नवीन फोन तुमचं लक्ष वेधून घेणार हे नक्की. Infinix Hot 60 Pro+ नावाचा हा फोन केवळ डिझाइनमध्येच नव्हे, तर परफॉर्मन्स, डिस्प्ले, ऑडिओ आणि AI तंत्रज्ञानातही जबरदस्त कामगिरी करणार आहे. आणि हो, इन्फिनिक्सचा दावा आहे की हा जगातील सर्वात पातळ 3D कर्व्हड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. त्यात JBL स्पीकर्सचा दमदार आवाजही मिळणार आहे.

Infinix Hot 60 Pro+
हा फोन याआधी नायजेरियात सादर झाला असून, आता कंपनीने त्याचा जागतिक लाँच 25 जुलै रोजी जाहीर केला आहे. फिलीपिन्ससह इतर निवडक देशांमध्ये तो उपलब्ध होईल. भारतात तो केव्हा येईल, याची अजून घोषणा झालेली नाही, पण भारतात या मालिकेतील Hot 60 Pro आधीच लॉन्च झाला आहे, त्यामुळे Pro+ चं आगमनही दूर नसेल असं म्हणायला हरकत नाही.
या फोनचा सर्वात मोठा हायलाइट म्हणजे त्याचा 6.78 इंचाचा 3D कर्व्हड AMOLED डिस्प्ले. तो 1.5K रिझोल्यूशनसह येतो, आणि 144Hz रिफ्रेश रेट, 4,500 निट्स ब्राइटनेससारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. त्यात Corning Gorilla Glass 7i चे संरक्षण असून, रात्रीच्या वापरासाठी स्लीप मोड आणि लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनही आहे. म्हणजे डोळ्यांचं संरक्षणही लक्षात घेतलेलं आहे.
डिझाइन आणि परफॉर्मन्स
फोनचं डिझाइन बघितलं, तर तो खरंच नजरेत भरतो. मागे एका उभ्या गोळीच्या आकारात कॅमेरा मॉड्यूल दिलं असून त्यात दोन लहान कॅमेरा स्लॉट्स आणि एक लांब LED फ्लॅश युनिट आहे. पुढे अगदी बारकं बेझल आणि वरच्या मध्यभागी पंच होल कॅमेरा आहे, ज्यामुळे स्क्रीन अधिक मोठी आणि क्लीन वाटते.
या फोनच्या परफॉर्मन्ससाठी 6nm ऑक्टा-कोर MediaTek Helio G200 प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे, जो 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. XOS 15 वर आधारित Android 15 ही सिस्टीम AI वैशिष्ट्यांनी सजलेली आहे. AI Summarize आणि AI Image Extender सारख्या सुविधांमुळे अनुभव अधिक स्मार्ट होतो.
कॅमेरा, बॅटरी आणि कलर
कॅमेऱ्याच्या दृष्टीने, फोनमध्ये 50MP चा Sony IMX882 सेन्सर आहे जो OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येतो. सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा आहे. ऑडिओसाठी JBL च्या ड्युअल स्पीकर्समुळे फोनवर म्युझिक ऐकणं, व्हिडिओ बघणं किंवा गेमिंग करणं ही एक खास अनुभव ठरते.
बॅटरीबाबतही फोन मागे नाही. यात 5,160mAh ची दमदार बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, NFC, OTG, आणि USB टाइप-C सारख्या सर्व गरजेच्या गोष्टी आहेत. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP65 रेटिंगमुळे पाण्यापासून आणि धुळीपासूनही हा फोन सुरक्षित आहे.
स्लीक ब्लॅक, कोरल टाइड्स, सायबर ग्रीन, येलो, सिल्व्हर असे अनेक रंग पर्यायही या फोनमध्ये उपलब्ध असतील. त्याचं वजन फक्त 155 ग्रॅम असून जाडी केवळ 5.95 मिमी आहे, म्हणूनच तर हा जगातील सर्वात पातळ 3D कर्व्हड फोन मानला जातो.