DMart Full Name : ‘फोर्ब्स’ कडून अलीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार भारतातील सर्वाधिक टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये राधाकिशन दमानी यांचा सुद्धा नंबर लागतो. ‘फोर्ब्स’ ने जारी केलेल्या 2025 मधील जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते 122 व्या क्रमांकावर आहेत.
याच यादीनुसार जर पाहिलं तर ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे एकूण 15.4 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. ते डी मार्ट चे संस्थापक आहेत. गेल्या काही वर्षांत वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. पण या वाढत्या महागाईच्या काळात, डी-मार्ट सामान्य लोकांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.

डी मार्ट मध्ये किराणा मालापासून ते घरगुती वस्तूंपर्यंत सर्व काही मिळत. सर्व वस्तू एकाच छताखाली मिळतात सोबतच सर्व वस्तूंवर DMart मध्ये मोठा डिस्काउंट सुद्धा मिळतो. यामुळेच मध्यमवर्गीय कुटुंबांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरीदीसाठीची पहिली पसंती म्हणजे DMart आहे.
DMart अशा कुटुंबांसाठी फारच फायद्याचे ठरते ज्या कुटुंबातील सर्वच लोक नोकरीला आहेत, ज्या लोकांना त्यांच्या धावपळीच्या जीवनामुळे एकाच छताखाली सर्वकाही खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी डी मार्ट हे सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. पण तुम्हाला डी मार्ट चा फुल फॉर्म माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत माहिती पाहूयात.
DMart चा फुल फॉर्म काय?
डी-मार्ट भारतातील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये समाविष्ट राधाकृष्ण दमानी यांनी सुरू केले. दमानी यांनी 1980 च्या दशकात शेअर बाजारात प्रवेश केला होता आणि शेअर बाजारातून त्यांनी कोट्यवधींची कमाई केली.
दरम्यान, ग्राहकांच्या गरजा समजून घेत त्यांनी 2002 मध्ये दमानी मार्ट सुरू केले. हेच दमानी मार्ट आता डी मार्ट म्हणून ओळखले जाते. म्हणजे डी-मार्टचे मूळ नाव ‘दमानी मार्ट’ होते आणि आता ते DMart या नावाने संपूर्ण भारतभर ओळखले जाते आणि याच्या संपूर्ण भारतात शाखा आहेत.
देशात डी मार्टचे किती स्टोर आहेत?
आजच्या घडीला डी-मार्ट भारतातील 11 राज्यांमध्ये पसरलेले आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील डी मार्ट चे असंख्य स्टोअर पाहायला मिळतात. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये तर डी मार्ट आहेच शिवाय तालुक्याच्या गावांमध्ये देखील आता डी मार्ट ओपन झाले आहे.
DMart महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये आपला बिजनेस चालवत आहे. या राज्यांमध्ये डी मार्टचे एकूण 375 हुन अधिक स्टोअर असल्याची माहिती समोर आली आहे.
यातील प्रत्येक स्टोअरमध्ये स्वस्त आणि आवश्यक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. डी-मार्ट स्वतःच्या इमारतींमध्ये स्टोअर्स चालवते, ज्यामुळे भाडे वाचते आणि याचा फायदा ते थेट ग्राहकांना देतात.