Nashik News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही राज्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा या अनुषंगाने रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान पुणे प्रमाणेच महाराष्ट्रातील आणखी एका बड्या शहरात रिंग रोडचे काम सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंभ नगरी म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक शहरात 60 किलोमीटर लांबीचा नवा रिंग रोड विकसित होणार असून या रिंग रोड प्रकल्पाच्या बाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

खरंतर, श्रीक्षेत्र नाशिक येथे बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी श्रीक्षेत्र प्रयाग राज येथे बारा वर्षांनी कुंभमेळा झाला होता आणि असाच कुंभमेळा आता श्रीक्षेत्र नाशिक येथे आयोजित होणार आहे.
प्रयागराज प्रमाणेच श्रीक्षेत्र नासिक येथे सुद्धा जगभरातील सनातन भाविक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहेत. कुंभमेळ्याला लाखोंच्या संख्येने भाविक नाशिक येथे दाखल होतील आणि यामुळे साहजिकच गर्दीचे नियोजन करणे प्रशासनासाठी चॅलेंजिंग काम राहणार आहे.
दरम्यान याच आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून नाशिक मध्ये रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. महत्वाची बाब अशी की, प्राधिकरणाकडून नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरीसाठी अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला आहे.
https://x.com/TheINIofficial/status/1946500390125818000?t=IdeUHG3qejHXzEPsR0jxdw&s=19
कसा असणार नाशिक मधील रिंग रोड प्रकल्प?
राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कुंभ नगरी नाशिक मध्ये 60 किलोमीटर लांबीचा, चार पदरी ग्रीनफील्ड रिंग रोड विकसित केला जाणार आहे. यामुळे नाशिक शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आणि येथील औद्योगिक तसेच नागरी विकासाला चालना मिळणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जातोय.
तसेच या प्रकल्पात दोन स्वतंत्र ग्रीनफील्ड कनेक्टर्सचा सुद्धा समावेश राहणार आहे. समृद्धी महामार्गाशी जोडणारा 13 किमीचा कनेक्टर आणि नाशिक (ओझर) विमानतळाशी जोडणारा 4 किमीचा कनेक्टर हे दोन्ही मार्ग वाहतुकीस सुलभता देणारे ठरणार अशी माहिती तज्ञांकडून दिली जात आहेत.
विशेषतः समृद्धी महामार्गाशी थेट संपर्क साधणारा कनेक्टर नाशिकला मराठवाडा, विदर्भ आणि कोकणासारख्या भागांशी वेगवान जोडणी प्रदान करणार आहे. दरम्यान आता नाशिक शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोड प्रकल्पासाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार रिंग रोडचा प्रस्ताव पर्यावरणीय मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
आता याला पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादन आणि प्रत्यक्ष बांधकामाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तथापि या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी हा प्रकल्प पूर्ण होईल का? असे अनेक प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत.