Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत आणि त्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेचा सुद्धा समावेश होतो. दरम्यान याच पीएनबीच्या ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे 8 ऑगस्ट 2025 नंतर पंजाब नॅशनल बँकेच्या काही ग्राहकांचे अकाउंट बंद केले जाणार आहे.
काय आहे संपूर्ण अपडेट
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेचे जे ग्राहक 8 ऑगस्ट 2025 पर्यंत केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तर त्यांचे अकाउंट तात्पुरते बॅन केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल आणि तुमची केवायसीची प्रक्रिया प्रलंबित असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

बँकेने केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 8 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे. बँकेने जर ग्राहकांनी विहित मुदतीत केवायसी अपडेट केले नाही तर त्यांचे अकाउंट बॅन केले जाईल असे सुद्धा सांगितले आहे.
केवायसी अपडेट केली नाही तर काय होणार
8 ऑगस्ट 2025 पर्यंत केवायसी अपडेट केली नाही तर पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांचे अकाउंट तात्पुरते बॅन केले जाणार आहे याचा परिणाम म्हणून ग्राहकांना त्यांच्या अकाउंट मधून कुठलाही व्यवहार करता येणार नाही. म्हणजे अकाउंट मध्ये त्यांचे पैसे जमा असतील तर ते पैसे सुद्धा त्यांना काढता येणार नाही. बँक खात्यावर तात्पुरती बंदी घातली जाणार आहे.
केवायसी अपडेट केली नाही तर बँक ग्राहकांना पैसे खात्यात जमा करता येणार नाहीत आणि खात्यातील जमा रक्कम सुद्धा काढता येणार नाही म्हणूनच केवायसीची प्रक्रिया दिलेल्या मुदतीत ग्राहकांनी पूर्ण करावी असे आवाहन बँकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. आता आपण केवायसी कशी करायची याची माहिती पाहणार आहोत.
केवायसीची प्रक्रिया कशी करणार
जर तुम्हाला ऑफलाइन केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेमध्ये जा आणि ओळखपत्र, पत्ता पुरावा, अलीकडील फोटो, पॅन कार्ड/फॉर्म 60, उत्पन्नाचा दाखला आणि मोबाईल नंबर अशी आवश्यक कागदपत्रे देऊन केवायसी अपडेट करून घ्या.
जर तुम्हाला ऑनलाईन ठेवायचे ची प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
याव्यतिरिक्त तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या पीएनबी वन या ॲप्लिकेशनवर जाऊन देखील केवायसी ची प्रक्रिया सहजतेने पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या बँक शाखेत नोंदणीकृत ई-मेल किंवा पोस्टच्या माध्यमातून केवायसी रिलेटेड डॉक्युमेंट पाठवून केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता.