राशीन- छत्रपती शिवरायांना शाहिरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी सर्वप्रथम सातासमुद्रापार रशियात नेले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची जागृती आणि चळवळ अण्णा भाऊ साठे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवली म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भिताडे यांनी केले.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेतर्फे साठे चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात भिताडे बोलत होते.

या कार्यक्रमास युवक नेते शहाजी राजेभोसले, तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष शंकर देशमुख, शाहू राजेभोसले, श्याम कानगुड, बडा मांढळ, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आजिनाथ मोढळे, उद्योजक बबन जंजिरे, तात्यासाहेब माने, विलास काळ, रिपाइंचे भीमराव साळवे, रामकिसन साळवे, संजय चव्हाण, प्रभाकर साळवे, अतुल साळवे, नवनाथ साळवे, दीपक थोरात, सावता परिषदेचे बापू धोडे, विक्रम राजेभोसले, मधुकर दंडे,
माउली सायकर, सोयब काझी, अशोक जंजिरे, वंचित बहुजन आघाडीचे पोपट शेटे, अमोल शेटे, अय्याज सय्यद, बबलू कुरेशी, दीपक काळे, योगेश गायकवाड, दिलीप थोरात, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, हवालदार मारुती काळे, अमोल अहिरे, योगेश भोज, विशाल माने, किरण जाधव, रावसाहेब पंडित, शरफुद्दीन सय्यद यांच्यासह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
मातंग एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष ढावरे, सतीश उकिरडे, आनंद उकिरडे, बापू उकिरडे, राजेंद्र ढावरे, गणेश उकिरडे, अक्षय उकिरडे, देविदास उकिरडे यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.