शेवटी मुहूर्त ठरला ! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसानचा 21 वा हप्ता

Published on -

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची एक महत्त्वाची योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेचे देशभरात कोट्यावधी लाभार्थी आहेत. दरम्यान, जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी दिवाळी संपताच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.

या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो ? या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. खरे तर पीएम किसान अंतर्गत देण्यात येणारे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एक रकमी मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण करण्यात येते.

दरम्यान आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 20 हप्ते देण्यात आले आहेत. तर काही राज्यांमधील शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच 21 वा हप्ता मिळाला आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमधील पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना 21 वा हप्ता दिवाळीच्या आधीच मिळाला आहे.

कारण म्हणजे या राज्यांमध्ये भयानक पूरस्थिती तयार झाली होती आणि या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदत म्हणून तेथील शेतकऱ्यांना या योजनेचा 21 वा हप्ता दिवाळीच्या आधीच वितरित करण्यात आला.

महाराष्ट्रात सुद्धा पूरस्थिती तयार झाली होती पण सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी असा कोणताच निर्णय घेतला नाही, यामुळे साहजिकच राज्यातील शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी सुद्धा आहे. पण आता लवकरच महाराष्ट्रात सर्वच राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छटपूजेच्या निमित्ताने पीएम किसानच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील 21 वा हप्ता वितरित करण्यात येऊ शकतो.

केंद्रीय कृषी विभागाने सुद्धा अलीकडेच एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती दिलेली होती.

परंतु या संदर्भात अजून अधिकृत पत्रक किंवा अधिकृत विधान सरकारकडून जारी करण्यात आलेले नाही. यामुळे खरंच शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान नोव्हेंबरमध्ये बिहार राज्यात विधानसभा निवडणुका देखील संपन्न होणार आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून पीएम किसानचा पुढील हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे.

ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नक्कीच, या योजनेचा पुढील हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News