Rule Change November : नोव्हेंबर महिना सर्वसामान्यांसाठी वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण म्हणजे पुढील महिन्यात काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट प्रभाव पडणार असून आज आपण 1 नोव्हेंबर 2025 पासून नेमके कोणते नियम बदलणार आणि या बदललेल्या नियमांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
खरे तर ऑक्टोबर महिना संपण्यास आता फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि यामुळे नोव्हेंबर मध्ये कोणकोणते नियम बदलणार याबाबत सर्वसामान्यांना जाणून घेण्याची उत्सुकता देखील लागली आहे. दर महिन्याला सरकारी नियमात थोडेफार बदल होत असतात. पुढील नोव्हेंबर महिन्यात देखील असेच काहीसे बदल आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत.

एक नोव्हेंबर 2025 पासून एलपीजी सिलेंडर पासून ते आधार अपडेट प्रक्रियेपर्यंत अनेक आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळणार आहेत. आता आपण नोव्हेंबर महिन्यात कोणते पाच महत्त्वाचे नियम बदलणार आहेत याचा आढावा या ठिकाणी घेऊयात.
एक नोव्हेंबर पासून बदलणार हे पाच महत्त्वाचे नियम
गॅस सिलेंडर चे रेट बदलणार – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलेंडर चे रेट बदलले जातात. घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचे रेट सातत्याने बदलत असतात.
गेल्या काही महिन्यांपासून 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरचे म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरचे रेट बदललेले नाहीत पण व्यावसायिक अर्थात 19 किलो वजनी गॅस सिलेंडरचे रेट सतत बदलत आहेत. दरम्यान आता एक नोव्हेंबरला देखील घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रेट मध्ये बदल होणार आहेत. एका तारखेला एकतर सिलेंडरचे रेट कमी होतील किंवा सिलेंडरचे रेट वाढतील.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे नियम बदलले – 1 नोव्हेंबर पासून SEBI चे नवीन नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमानुसार आता ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या मधील अधिकारी/कुटुंबीयांनी 15 लाखांहून अधिक गुंतवणूक किंवा रिडेम्प्शन केल्यास, त्याची माहिती त्वरित ‘कंप्लायंस ऑफिसर’ला देणे बंधनकारक राहणार आहे. म्युचल फंड मधील गुंतवणुकीत अधिक ट्रान्सपरन्सी वाढवण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
SBI क्रेडिट कार्ड शुल्क वाढणार – एक नोव्हेंबर पासून एसबीआयच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थर्ड पार्टी एप्लीकेशन जसे की पेटीएम, फोन पे च्या माध्यमातून मुलांच्या शाळेचे तसेच कॉलेजची फी भरण्यासाठी अतिरिक्त एक टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. पण शाळा कॉलेजच्या वेबसाईट वरून किंवा त्यांच्या पीओएस मशीन द्वारे पेमेंट केल्यास अतिरिक्त शुल्क लागणार नाही.
बँकेच्या नॉमिनेशन नियमांमध्ये बदल – आतापर्यंत बँक ग्राहकांना बँक खाते, लॉकर आणि सेफ कस्टडीसाठी एक नॉमिनी लावता येत होता पण आता ग्राहकांना चार नॉमिनी लावता येतील. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या नॉमिनीला किती हिस्सा द्यायचा हे सुद्धा निश्चित करता येणार आहे. नक्कीच बँक ग्राहकांसाठी सुरू करण्यात येणारी ही सुविधा फायद्याची ठरणार आहे.
आधार अपडेट झाले सोपे – एक नोव्हेंबर पासून आधार कार्ड अपडेट करणे सुद्धा सोपे होणार आहे. नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा मोबाईल नंबर यांसारखे महत्त्वाचे बदल करण्यासाठी आता आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. पुढील महिन्यासाठी ही कामे आपल्याला घरूनच करता येणार आहेत.













