Health Tips : तुमच्याही घरात तुरटी असेल? पण हा पांढरा पदार्थ नेमकं कशात वापरतात किंवा याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला जातो याबाबत अनेकांना माहिती नसते. खरंतर हा छोटासा पांढरा दगड तुमच्या आयुष्यातील अनेक गंभीर समस्या दूर करू शकतो.
तुरटीचे रासायनिक नाव पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट असे असून याचा वापर अनेक प्रमुख समस्येच्या निराकरणासाठी केला जातो. तुरटी अनेक समस्यांमध्ये गुणकारी आढळून आली आहे.

याचे असंख्य आरोग्यवर्धक फायदे आहेत जे की आपल्याला माहिती नसतात. आरोग्य तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे की तोंडाची दुर्गंधी, शरीराचा वास,
पायांना पडलेल्या भेगा असे असंख्य समस्या सोडवण्यासाठी मदत करते. आता आपण दहा रुपयाला मिळणाऱ्या या तूरटीचा वापर कोण कोणत्या पद्धतीने केला जाऊ शकतो? याची डिटेल माहिती पाहूयात.
त्वचा डिटॉक्स करते – शरीरावर जमलेली घाण दूर करण्यासाठी डिटॉक्स बाथ घेण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे तुरटीची पावडर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यास तुम्ही तुमची त्वचा डिटॉक्स करू शकता. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते आणि शरीरावरील घाण निघून जाते.
पायांना पडलेल्या भेगा दूर करते- तुमच्या पण पायाला भेगा पडलेल्या असतील तर तुरटी तुमच्या कामी येणार आहे. तुरटीची पावडर नारळ तेलामध्ये मिक्स करून भेगा पडलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावल्यास पायाच्या टाचेचे त्वचा मऊ होणार आहे. या उपायामुळे पायांना पडलेल्या भेगा दूर होतात.
Natural Deodorant म्हणून वापरता येते – केमिकलयुक्त डिओडरंटचा वापर करायचा नसेल तर तुम्ही शरीरावर तुरटीचा दगड फिरवू शकता. यामुळे घाम आणि शरीरातील दुर्गंधी कमी होते.
अंडर आर्म्स मध्ये तुरटी फिरवा – तुम्हाला जर परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही अंडर आर्म्समध्ये तुरटी फिरवायला हवी.
तोंडातील दुर्गंधी कमी करते – तोंडाचा घाण वास येत असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्याने गुळण्या करायला हव्यात. नेचुरल माऊथ वॉश म्हणून तुम्ही तुरटीच्या पाण्याने गुळण्या करू शकता.












