Post Office मध्ये 60 महिन्यांसाठी 200000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Post Office Saving Scheme : FD करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर, गेल्या काही महिन्यात विविध बँकांनी आपल्या फिक्स डिपॉझिट योजनेच व्याजदर कमी केले आहे. कारण म्हणजे आरबीआयने रेपोरेटमध्ये गेल्या एका वर्षाच्या काळात एका टक्क्यांची कपात केली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयच्या पद्धत धोरणाची बैठक नुकतेच सुरू झाली आहे आणि याचे निर्णय शुक्रवारी जाहीर होणार आहेत.

आरबीआय कडून शुक्रवारी निर्णयाची माहिती दिली जाणार असून आधीच आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा स्थितीत येत्या काळात फिक्स डिपॉझिटचे व्याजदर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. देशातील विविध बँकांनी एफडीचे व्याजदर कमी केले असलेत तरीदेखील पोस्ट ऑफिसचे व्याजदर आजही कायम आहे. दरम्यान, आज आपण पोस्टाच्या TD योजनेची माहिती पाहणार आहोत. पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजना म्हणजेच एफ डी योजनेत 60 महिन्यांसाठी गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार याचा आढावा आज आपण येथे घेणार आहोत.

कशी आहे पोस्टाची TD योजना?

पोस्ट ऑफिसची TD योजना 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष कालावधीची आहे. यातील एक वर्षाच्या TD योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9% दराने व्याज दिले जाते. यातील दोन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के दराने व्याज दिले जाते. 3 वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10 टक्के दराने व्याज दिले जाते. तसेच 5 वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.50 टक्के दराने व्याज दिले जाते. आता आपण पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेत 60 महिने म्हणजे 5 वर्षांसाठी दोन लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळतील? याची माहिती जाणून घेऊयात.

60 महिन्यात किती रिटर्न मिळणार?

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 60 महिने कालावधीसाठी पोस्टाच्या TD योजनामध्ये दोन लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.5% दराने दोन लाख 89 हजार 990 रुपये मिळणार आहेत. अर्थात पाच वर्षांच्या कालावधीत 89 हजार 990 रुपये सदर गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता देशातील कोणतीच बँक एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याज ऑफर करत नाही.