नाशिक ते अक्कलकोट प्रवास होणार वेगवान ! देशातील दुसरा सर्वात लांब सहापदरी महामार्ग ‘या’ भागातून जाणार

Nashik Akkalkot Expressway : देशातील दळणवळण व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने केंद्रातील मोदी सरकारकडून गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात विविध प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यात आली आहेत.

गेल्या दीड दोन दशकांच्या काळात देशात अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे सुरु आहेत.

महाराष्ट्रात देखील गेल्या काही वर्षांच्या काळात अनेक मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्णत्वाला गेले आहेत आणि आता राज्याला लवकरच आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे.

हा महामार्ग देशातील दुसरा सर्वात लांब सहा पदरी महामार्ग राहणार आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे नंतर हाच महामार्ग देशातील सर्वाधिक लांब महामार्ग राहील. सुरत ते चेन्नई दरम्यान उभारण्यात येणारा हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठा गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.

राज्यातील एकात्मिक विकासासाठी सुद्धा हा रस्ता एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विशेष म्हणजे या द्रुतगती महामार्गात महाराष्ट्रातील नाशिक शहराला केंद्रस्थान मिळाले आहे. यामुळे नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

हा सहा पदरी एक्सप्रेसवे गुजरातमधील सुरतपासून सुरू होऊन थेट तमिळनाडूतील चेन्नईपर्यंत जाणार आहे. यामुळे फक्त सुरत ते चेन्नई हाच प्रवास वेगवान होईल असे नाही तर नाशिक ते अक्कलकोट दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या महामार्गाचा मोठा लाभ मिळणार आहे.

खरंतर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक  गर्दी करतात. नाशिक शहरासहित जिल्ह्यातूनही अनेक भाविक अक्कलकोटला दर्शनासाठी जातात आणि याच भाविकांसाठी हा महामार्ग फायद्याचा ठरणार आहे.

कारण की या महामार्ग प्रकल्पामुळे नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास अवघ्या चार तासांमध्ये पूर्ण करता येईल असा विश्वास व्यक्त होतोय. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू अशी सहा राज्ये या महामार्गामुळे थेट जोडली जाणार आहेत.

ही प्रमुख सहा राज्य एकाच महामार्गाद्वारे कनेक्ट होणार असल्याने या प्रकल्पाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब द्रुतगती महामार्ग ठरण्याची शक्यता असलेल्या या प्रकल्पामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या महामार्गाचा नाशिकमधून जाणारा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे. धार्मिक, औद्योगिक आणि व्यापारी दृष्टीने नाशिक हे शहर आधीपासूनच महत्त्वाचे केंद्र असून, नव्या एक्सप्रेसवेमुळे या शहराची कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होणार आहे.

नाशिक ते अक्कलकोट आणि पुढे दक्षिण भारतातील विविध धार्मिक स्थळे एकाच मार्गाने जोडली जाणार असल्याने भाविकांसाठीही प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

प्रवाशांचे 5 तास वाचणार 

सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे प्रकल्पाचे काम एकूण दोन टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक ते अक्कलकोट दरम्यानचे काम हाती घेतले जाणार असून या टप्प्याची एकूण लांबी 374 किलोमीटर इतकी आहे. सध्या स्थितीला नाशिक ते अक्कलकोट हा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना जवळपास नऊ तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. मात्र जेव्हा हा एक्सप्रेस वे बांधून तयार होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी पाच तासांनी कमी होईल म्हणजेच हा प्रवास फक्त चार तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण की, या दोन्ही महानगरांमधील अंतर जवळपास 150 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास कालावधी तर कमी होणारच आहे शिवाय इंधनाच्या खर्चात देखील बचत होईल असा विश्वास व्यक्त होतो. या द्रुतगती मार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो दोन प्रमुख बंदरांना जोडणार आहे. महाराष्ट्रातील प्रस्तावित वाढवण बंदर आणि चेन्नई बंदर यांना हा मार्ग थेट कनेक्ट करणार आहे आणि म्हणूनच हा महामार्ग देशाच्या उद्योग क्षेत्राला देखील नवीन दिशा देणारा ठरणार आहे. देशातील दोन महत्त्वाचे बंदर एकमेकांना रस्ते मार्गाने कनेक्ट झाल्यास मालवाहतूक अधिक जलद होणार असून, आयात – निर्यात सुद्धा वेगवान होणार आहे. उद्योग, व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी हा महामार्ग मैलाचा दगड ठरणार अशी आशा आहे. या महामार्गामुळे धार्मिक पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. कारण यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट आणि श्रीक्षेत्र नाशिक या दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे.