Share Market News : 2025 हे वर्ष सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमुळे गाजले. यावर्षी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त नफा मिळाला. चांदीच्या आणि सोन्याच्या किमतीने नवीन रेकॉर्ड तयार केलेत. साहजिकच याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला.
त्याचवेळी शेअर मार्केटवर यावर्षी मोठा दबाव पाहायला मिळाला. शेअर मार्केटमध्ये अनेक महिने मंदी होती आणि याचा फटका गुंतवणूकदारांना बसला. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेलेत.

शेअर मार्केट मधील चढउताराचा गुंतवणूकदारांना फटका बसला असला तरीदेखील मार्केटमधील काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी विशेष लाभाचे ठरलेत.
दरम्यान आज आपण शेअर मार्केट मधील अशाच पाच शेअर्सची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी शेअर मार्केट मधील चढउताराच्या काळात सुद्धा गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिलाय.
फॅबटेक टेक्नॉलॉजीज क्लीनरूम्स : या यादीत हा स्टॉक पाचव्या नंबरवर येतो. या कंपनीच्या शेअर्सने 2025 मध्ये आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 255% रिटर्न दिले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीचा स्टॉक 85 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. पण सध्या स्थितीला हा स्टॉक 302 रुपयांच्या आसपास व्यवहार करतोय.
झेलिओ ई-मोबिलिटी : ही ईव्ही क्षेत्रातील कंपनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरली आहे. एकीकडे मार्केटमध्ये चढ-उतार होत होते तर दुसरीकडे या कंपनीचा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत होता.
वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीचा 134 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. मात्र सध्या स्थितीला या कंपनीच्या शेअरची किंमत 495 रुपये इतकी आहे. म्हणजेच या शेअर्सने 2025 मध्ये आत्तापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 264 टक्के रिटर्न दिले आहेत.
साचीरोम : लिस्टिंगनंतर सातत्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढच पाहायला मिळाली आहे. शेअर मार्केट वरील दबाव सुद्धा या कंपनीच्या कामगिरीवर विशेष प्रभाव टाकू शकला नाही. दबावात सुद्धा या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 272 टक्के रिटर्न दिले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला या शेअरची किंमत 102 रुपये होती मात्र आज ही किंमत 380 रुपये झाली आहे.
क्रायोजेनिक OGS : या कंपनीच्या शेअरने 2025 मध्ये आत्तापर्यंत गुंतवणूकदारांना 274% इतके रिटर्न दिले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला शेअरची किंमत 47 रुपये होती. मात्र सध्या स्थितीला या कंपनीचे शेअर्स 176 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करताना दिसतात.
अनोंदिता मेडिकेअर : या कंपनीचा स्टॉक यादीत पहिला नंबरवर आहे. 2025 मध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल बनवले आहे. वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरची किंमत 145 रुपये होती मात्र आता ही किंमत 695 रुपयांच्या पुढे गेली आहे. म्हणजेच या वर्षात आत्तापर्यंत या शेअर्सने 379 टक्के इतके रिटर्न दिले आहे.