Low Investment Business : पैसे नाहीत मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? मग चिंता करू नका आजचा हा लेख तुमच्याच कामाचा आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
नोकरीऐवजी आता नवयुवक तरुण वर्ग व्यवसायाला जास्त प्राधान्य देतोय आणि बिजनेस मधून नवयुवकांना चांगला फायदा सुद्धा मिळत आहे. मात्र व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण येते ती भांडवलची.

प्रत्येकाकडे व्यवसायासाठी लाखो रुपयांचे भांडवल असते आणि म्हणूनच अनेकजण इच्छा असतानाही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाहीत.
मात्र बदलत्या काळात अनेक असे नवीन बिझनेस समोर येत आहेत ज्यासाठी फारशी गुंतवणूक करावी लागत नाही आणि घरबसल्या असे व्यवसाय सहज करता येतात. दरम्यान आज आपण अशाच तीन व्यवसायाची सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.
ग्राफिक्स डिझायनिंग : अलीकडे सोशल मीडियाचा वापर वाढलाय आणि यामुळे ग्राफिक डिझाईनचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. हे असे क्षेत्र आहे ज्याला नेहमीच मागणी असते. ग्राफिक डिझायनिंग शिकून महिला चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
आजकाल बहुतेक काम ऑनलाइन केले जाते. आता व्यवसायांसाठीही वेबसाइट्स डिझाइन केल्या जात आहेत. परिणामी, ग्राफिक डिझायनर्सची मागणी वाढत आहे. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स शिकू शकता आणि फ्रीलान्सिंगद्वारे घरबसल्या चांगले उत्पन्न मिळवू शकता.
योग आणि ध्यान केंद्र : आजकाल, लोक आरोग्याबाबत अधिकाधिक जागरूक होत आहेत. कोविड-19 साथीच्या आजारानंतर, योग, ध्यान केंद्रे आणि झुम्बा प्रशिक्षकांची मागणी वाढली आहे. लाखो लोक हे वर्ग ऑनलाइन घेतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही सुद्धा योग आणि ध्यान केंद्र सुरू करू शकता. योगाचे क्लासेस तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता.
हँडमेड दागिने : आजच्या या आधुनिक युगात हँडमेड दागिन्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. जर तुम्हाला हस्तकला आवडत असेल तुम्ही हॅन्डमेड दागिने बनवत असाल किंवा लाकूड, कागद किंवा इतर साहित्यापासून हस्तनिर्मित हस्तकला बनवण्याची क्षमता असेल, तर तुम्ही तुमच्या या पॅशनला व्यवसायाचे रूप देऊ शकता.
हा व्यवसाय तुम्हाला छंद आणि उत्पन्नाचा स्रोत दोन्ही देईल. हे क्षेत्र खूप विस्तृत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही उत्पादन बनवू आणि विकू शकता.