Mahindra Scorpio N Facelift : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. 2026 हे वर्ष नव्याने कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. विशेषता ज्यांना महिंद्राची स्कॉर्पिओ कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी पुढील वर्षे खास राहणार आहे.
कारण की, कंपनीने अलीकडेच लॉन्च केलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ N याचे फेसलिफ्ट मॉडेल 2026 च्या अगदी सुरुवातीलाच लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या लोकप्रिय SUV स्कॉर्पियो N साठी मोठा मिड-लाइफ फेसलिफ्ट अपडेट सादर करण्याच्या तयारीत आहे.

ही अपडेटेड स्कॉर्पियो N नवीन वर्षाच्या अगदीच सुरुवातीला लॉन्च होणार अशी बातमी समोर येत आहे. भारतीय कार मार्केटमध्ये हे अपडेटेड फेसलिफ्ट मॉडेल जानेवारी महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
याआधी महिंद्राकडून XUV 7XO म्हणजेच सध्याच्या XUV700 चे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. महिंद्रा स्कॉर्पियो N ही SUV मजबूत बॉडी, दमदार इंजिन आणि उत्कृष्ट ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाणारी आणि ग्राहकांमध्ये एक लोकप्रिय SUV आहे.
आता या गाडीचे फेसलिफ्ट वर्जन मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. ह्या अपडेटमुळे या गाडीला अधिक प्रीमियम लूक मिळणार असून ग्राहकांना या गाडीत अनेक आधुनिक फीचर्स पाहायला मिळू शकतात.
गाडीच्या एक्सटीरियर डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा अपेक्षित आहेत. रिपोर्ट मधून प्राप्त माहितीनुसार नव्या अपडेट मध्ये कंपनीकडून नवीन LED हेडलाइट्स, रिडिझाइन्ड टेल-लाइट्स आणि आकर्षक फॉग लॅम्प्स अशा काही गोष्टी ऍड केल्या जाणार आहेत.
याशिवाय, SUV मध्ये नवीन ट्रिम एलिमेंट्स आणि फ्रेश अलॉय व्हील डिझाइन देण्यात येण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. मात्र, अलॉय व्हीलचा साइज सध्याप्रमाणेच 18-इंच ठेवण्यात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इंटीरियरबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, महिंद्राच्या अलीकडील मॉडेल्सचा विचार करता फीचर्समध्ये मोठे अपडेट्स मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या 8 इंच टचस्क्रीनऐवजी 10.25 इंचाचा मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात येऊ शकतो.
यामध्ये थ्री-रो सीटिंग लेआउट, ADAS सेफ्टी फीचर्स, 12-स्पीकर सोनी साउंड सिस्टम आणि ड्यूल-झोन क्लायमेट कंट्रोलसारखी प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही.
फेसलिफ्ट स्कॉर्पियो N मध्ये सध्याप्रमाणेच 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिनचे पर्याय मिळतील. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असतील. डिझेलच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये 4×4 ड्राइव्ह सिस्टमही कायम राहणार आहे.
फेसलिफ्ट महिंद्रा स्कॉर्पियो N ची संभाव्य किंमत 14 लाख ते 26 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. नव्या डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्ससह ही SUV पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठी चर्चा निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.