Maharashtra News : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून अचानक शनिवारी सुट्टी जाहीर करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आम्ही आपल्यास माहितीसाठी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. 2 डिसेंबर रोजी ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

पण त्यावेळी राज्यातील काही नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान याच उरलेल्या जागांसाठी उद्या, शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हाती आली आहे.
दरम्यान याचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. उद्या राज्यातील काही भागांमध्ये शासकीय सुट्टी राहणार आहे. जिथे मतदान प्रक्रिया पूर्ण होईल त्या ठिकाणी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात काही ठिकाणी विविध कारणांमुळे मतदान होऊ शकले नव्हते. त्या उर्वरित जागांसाठी उद्या मतदान घेण्यात येत असून, संबंधित मतदान क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी यासंदर्भात सर्व विभागप्रमुखांना परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकानुसार, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तसेच पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सुट्टी घेता येणार नाही. निवडणुकीच्या काळात प्रशासनावर मोठी जबाबदारी असल्याने सर्वांनी तत्परतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात नऊ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक कार्यालयाला आवश्यक ते निवडणूक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
यामुळे मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि महापालिकेचे कर्मचारी समन्वयाने काम करणार आहेत. तसेच मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि कर्मचारी उपस्थिती सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.
राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उरलेल्या जागांसाठी होणारे हे मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.