Namo Shetkari Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या संदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार , नमोचा हाता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असून यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खरे तर , नमो शेतकरी योजना ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू झाली असून पीएम किसानच्या लाभार्थ्यांना महिनाभरापूर्वी 21व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते.

त्यानंतर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि आता याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरे तर , नवे वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे आणि नव्या वर्षाच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळाली आहे.
कधी मिळणार नमोचा हप्ता ?
आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे एकूण सात हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आता आठवा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल.
मिळालेल्या माहितीनुसार , महाराष्ट्र राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता 1 जानेवारी 2026 रोजी वितरित होऊ शकतो.
खरंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सरकारकडून डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातच नमो शेतकरीचा पुढील आठवा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो , असा दावा केला जात आहे. पण जर काही तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर झाला तर एक जानेवारी रोजी हा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी शक्यता आहे.
किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
नमो शेतकरी सन्मान निधी योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू आहे. या योजनेचा लाभ पीएम किसानच्या लाभार्थ्यांनाच मिळतो. खरे तर राज्यातील 96 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यात आला होता आणि आता नमोचा आठवा हप्ता राज्यातील 92 ते 93 लाख शेतकऱ्यांना दिला जाईल अशी शक्यता आहे.
म्हणजेच लाभार्थी संख्या कमी झाली आहे. पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचा लाभ राज्यातील 92 ते 93 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता आणि आता नमो शेतकरीच्या आठव्या हफ्त्याचा लाभ देखील एवढ्याच शेतकऱ्यांना मिळणार अशी माहिती देण्यात आली आहे.