6 लाखाच्या आत Car शोधताय ? ‘ही’ हॅचबॅक ठरणार तुमच्यासाठी फायदेशीर, भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार!

Car Under 6 Lakh : नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात मग आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आजची बातमी बजेटमध्ये हॅचबॅक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे.

खरे तर भारतात मध्यमवर्गीयांना डोळ्यापुढे ठेवून अनेक वाहन कंपन्यांनी मिडरेंजमध्ये विविध मॉडेल्स लॉन्च केलेले आहेत. यामध्ये मारुती सुझुकीच्या स्विफ्ट चा देखील समावेश होतो. भारतीय कार मार्केटमध्ये हॅचबॅक सेगमेंट चा विचार केला तर ही कार पहिल्या नंबरवर येते.

गाव असो किंवा शहर सगळीकडे मारुती सुझुकी स्विफ्टचा बोलबाला आहे, हे नाव आजही या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. ही गाडी लॉन्च झाल्यापासून सर्वसामान्य ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. मध्यमवर्गीयांमध्ये ही गाडी एक ब्रँड आयकॉन म्हणून ओळखली जाते.

2005 साली पहिल्यांदा ही गाडी इंडियन कार मार्केटमध्ये अवतरली. स्विफ्ट लाँच झाल्यापासून ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. आज तुम्ही कुठेही जा तुम्हाला रस्त्यांवर ही गाडी सहज नजरेस पडेल.

भारतात कोणत्याही शहरात तुम्ही गेला तरी देखील तुम्हाला ही गाडी पाहायला मिळेल आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही गाडी अगदीच गाव खेड्यापासून ते मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये नजरेस पडते. आता ही केवळ एक गाडी राहिलेली नाही तर एक विश्वासार्ह ब्रँड आयकॉन म्हणून या गाडीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

या गाडीची लॉन्चिंग मारुती सुझुकी साठी देखील फायद्याचा सौदा ठरलेली आहे. मारुती सुझुकी या गाडीमुळे भारतात सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी बनलीय. आकर्षक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि खिशाला परवडणारे मायलेज यामुळे ही कार मध्यमवर्गीयांमध्ये सर्वात जास्त पसंत केली जाते.

तरुण वर्गासह छोट्या कुटुंब पण ही गाडी खरेदी करण्यास पसंती दाखवतात. दरम्यान तुम्हाला नव्या वर्षात ही गाडी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी गोड बातमी समोर आली आहे. नव्या वर्षात किंवा या वर्षअखेर Maruti Suzuki Swift खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण स्विफ्टच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट आधुनिक आणि स्पोर्टी डिझाइनसह बाजारात उपलब्ध आहे. फ्रेश फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प्स, स्टायलिश अलॉय व्हील्स यामुळे कारला प्रीमिअम लूक मिळतो.

इंटिरिअरमध्ये आरामदायी सीट्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ आणि नेव्हिगेशनसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रवास असो वा लांबचा ड्राईव्ह, स्विफ्टमध्ये प्रवास अधिक सुखद ठरतो.

परफॉर्मन्सच्या बाबतीतही स्विफ्ट कायमच पुढे राहिली आहे. या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते शहर आणि हायवे दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करते. काही व्हेरियंट्समध्ये स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे,

ज्यामुळे इंधनाची बचत होते आणि मायलेज वाढते. मॅन्युअल तसेच AMT (ऑटोमॅटिक) गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांना आपल्या गरजेनुसार निवड करता येते. सुरक्षेच्या बाबतीत मारुती सुझुकीने कोणतीही तडजोड केलेली नाही.

स्विफ्टमध्ये ड्युअल एअरबॅग्स, ABS सह EBD, ISOFIX चाईल्ड सीट माउंट्स, हिल होल्ड असिस्ट आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससारखी महत्त्वाची सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत. त्यामुळे ही कार कुटुंबासाठी सुरक्षित पर्याय ठरते.

कमी मेंटेनन्स खर्च, उत्कृष्ट रिसेल व्हॅल्यू आणि सर्व्हिस नेटवर्कमुळे स्विफ्ट आजही बाजारात ‘किंग’ मानली जाते. सध्या मारुती सुझुकी स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5 लाख 80 हजार रुपयांपासून सुरू होते.

विविध व्हेरियंट्स आणि शहरांनुसार किमतीत थोडाफार फरक असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, आगामी काळातही स्विफ्टचे भारतीय बाजारातील वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे.