Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच आनंदाची बातमी समोर आली आहे, ही बातमी आहे मेट्रो बाबत. पुण्यात मेट्रो सुरू झाल्यापासून सर्वसामान्यांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे.
सध्या स्थितीला शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कनेक्टिव्हिटी मेट्रो मार्गामुळे अधिक मजबूत झालेली दिसते. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर सध्या स्थितीला मेट्रो सुरू करण्यात आली आहे.

महत्वाची बाब म्हणजे येत्या काळात पुणे शहराला तिसरा मेट्रो मार्ग सुद्धा मिळणार आहे आणि याच तिसऱ्या मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत एक नवीन अपडेट हाती आल आहे. पुण्यातील तिसरा मेट्रो मार्ग प्रकल्प कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार या संदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच शहरातील तिसरा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. महा मेट्रोच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर विकसित होणारा हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग देखील प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
हा शहरातील तिसरा मेट्रोमार्ग राहणार असून हा मार्ग तीन मार्च 2026 पासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे. खरे तर अद्याप या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही पण याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचले आहे आणि म्हणूनच हा मेट्रो मार्ग मार्च महिन्यात सुरू होईल असा विश्वास व्यक्त होतोय.
मेट्रो मार्ग 3 हा 23.3 किलोमीटर लांबीचा म्हणजे जवळपास 24 किलोमीटर लांबीचा आहे. हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागाशी म्हणजेच शिवाजीनगर सोबत थेट कनेक्ट होणार आहे आणि म्हणूनच हिंजवडीत कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा मेट्रोमार्ग मोठा दिलासादायी ठरण्याची शक्यता आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी हा मार्ग 31 मार्च 2026 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू करावा असे स्पष्ट निर्देश सुद्धा दिलेले आहेत.
यानुसार सध्या या मार्गाचे युद्ध पातळीवर काम केले जात आहे. महत्त्वाची बाब अशी की हा मेट्रो मार्ग सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाजवळ सध्या कार्यरत असलेल्या मेट्रो लाईन 1 आणि लाईन 2 शी स्कायवॉकद्वारे जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एका मेट्रो मार्गावरून दुसऱ्या मेट्रो मार्गावर जाणे सोपे होणार आहे. या निर्णयामुळे जिल्हा न्यायालय स्थानक एक महत्त्वाचे जंक्शन स्थानक होईल.