Nagar News : नाशिक ते अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी सम्राट याचे ती म्हणजे कालपासून या मार्गावर एसटी महामंडळाच्या माध्यमातून नवीन इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे.
बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 पासून ही ई शिवाई बस प्रवाशांसाठी सुरू झाली असून आज आपण या बसचे संपूर्ण वेळापत्रक तसेच तिकीट बाबत माहिती जाणून घेणार आहोत. नाशिक विभागातून आत्तापर्यंत 60 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस सुरू झाल्या आहेत.

नाशिक विभागाकडून शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी गड, कसारा, मालेगाव, शिवाजीनगर, सटाणा, बोरीवली, छत्रपती संभाजी नगर या शहरासाठी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आले आहे.
अर्थात विभागातून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच बोरिवली कडे इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होत आहे. खानदेशातील तीनही जिल्हे म्हणजेच धुळे , नंदुरबार आणि जळगाव हे सुद्धा इलेक्ट्रिक बसेस सोबत कनेक्ट झालेले आहेत.
अशातच आता नाशिक ते अहिल्यानगर या मार्गावर ई शिवाई बस सुरू करण्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 65 इलेक्ट्रिक बसेस नाशिक आगाराच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
कस असणार वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आलेली नवीन इलेक्ट्रिक बस नाशिकहून अहिल्यानगरसाठी सकाळी सहा, सात, आठ, नऊ, 10 आणि 11 वाजता बस सोडली जाणार आहे. तसेच अहिल्यानगर येथून नाशिकसाठी दुपारी एक , दोन, तीन, चार, पाच आणि सहा वाजता बस सोडण्याचे नियोजन आहे. म्हणजेच नाशिक ते अहिल्यानगर अशा दिवसाला सहा फेऱ्या आणि अहिल्यानगर ते नाशिक अशा सहा फेऱ्या होणार आहेत.
तिकीट दर कसे असणार ?
नाशिक – अहिल्यानगर इलेक्ट्रिक बसच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर यासाठी संपूर्ण तिकिटाचा दर हा 471 रुपये इतका आहे. ज्यांना अर्ध्या तिकीट लागू आहे त्यांच्यासाठी हा दर 241 रुपये इतका असेल.
प्रवाशांना आरक्षणाची सुविधा मिळणार
एसटी महामंडळाकडून नाशिक ते अहिल्यानगर अशी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली असून या गाडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे गर्दीचे नियोजन व्हावे तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आरक्षणाची एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.