Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर डिसेंबर महिना संपण्याचा आता फक्त पाच दिवसांचा काळ बाकी आहे.
मात्र तरीही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत आणि यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून पुढील हप्ते कधी मिळणार हा सवाल उपस्थित केला जातोय.

दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. खरे तर सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि यामुळे राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अलीकडेच ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज साहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने युतीची घोषणा केली असून यामुळे महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची बनणार आहे. यामुळे आता महायुती सरकार राज्यातील महिलांना महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी भेट देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील महिलांना लवकरच लाडकी बहीण योजनेचे बाकी राहिलेले हप्ते दिले जाऊ शकतात. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता. यामुळे डिसेंबर महिन्यात निदान नोव्हेंबरचा तरी हप्ता जमा होईल अशी आशा लाडक्या बहिणींना होती.
मात्र अद्याप लाडक्या बहिणींसाठी अशी कोणतीच घोषणा झालेली नाही यामुळे नोव्हेंबर चा आणि डिसेंबर चा हप्ता कधी येणार हा सवाल कायम आहे. अशातच आता एक नवीन माहितीसमोर आली आहे ती म्हणजे मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना प्रलंबित हप्त्याची रक्कम दिली जाऊ शकते.
14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मोठा सण येतोय आणि याच मुहूर्तावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे मिळतील अशी आशा आहे. मकर संक्रांतीच्या आधी जानेवारी महिन्याचे पण हफ्ता वितरित होऊ शकतो.
म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते वितरित होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने अजून कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे मकर संक्रांतीच्या आधी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पैसे जमा होणार की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे जमा होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दुसरीकडे लाडक्या बहिणींना केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या महिला केवायसी ची प्रक्रिया करणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. यामुळे मुदतीत लाडक्या बहिणीनी केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.