Pune Railway : पुणे आणि अहिल्यानगरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून लवकरच एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्रातून युपी ला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन फायद्याची ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाने हिवाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ही विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष शुल्कावर पुणे ते प्रयागराज दरम्यान ही विशेष एकमार्गी रेल्वेगाडी सुरू केली जाणार आहे.

यामुळे पुणे ते प्रयागराज दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी अहिल्यानगर कोपरगाव समवेत खानदेशातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.
यामुळे पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातून यूपीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात. तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याची माहिती आता आपण येथे पाहणार आहोत.
विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार?
मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजून 55 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरून विशेष गाडी सोडली जाणार आहे. 27 डिसेंबरला सुटणारी ही गाडी 29 डिसेंबरला प्रयागराजला पोहचेल.
तसेच 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:55 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकातून दुसरी विशेष गाडी सोडली जाणार आहे ही गाडी 2 जानेवारीला पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी प्रयागराज येथे पोहोचणार आहे. आता आपण ही विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबेल याबाबत माहिती पाहुयात.
या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते प्रयागराज दरम्यान चालवली जाणारी एकमार्गी विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा घेईल. या गाडीला राज्यातील जवळपास आठ महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.
हडपसर, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई, ओरई, गोविंदपुरी व फतेहपुर या महत्त्वाच्या स्थानकावर विशेष गाडीला थांबा देण्यात आला आहे.