मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! उत्तर प्रदेशसाठी चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकावर मिळणार थांबा

Mumbai And Pune Railway News : मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हिवाळी हंगामात होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय मुंबई आणि पुण्यातून उत्तर प्रदेश ला जाणाऱ्या नागरिकांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यातून एकेरी विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई ते प्रयागराज आणि पुणे ते प्रयागराज अशी एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण मध्य रेल्वेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या या एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकाबाबत तसेच या गाड्या कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणारे संदर्भातील डिटेल माहिती आजच्या या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

मुंबई – प्रयागराज स्पेशल गाडीचे वेळापत्रक कसे राहणार?

मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे 26 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही विशेष गाडी रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता ही गाडी प्रयागराजला पोहोचणार आहे.

मुंबई ते प्रयागराज दरम्यान चालवल्या जाणार्या एकेरी विशेष गाडीची एकच फेरी होणार आहे. सेंट्रल रेल्वेने म्हटल्याप्रमाणे या विशेष एक्सप्रेस ट्रेनला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी, उरई, कानपूर सेंट्रल, गोविंदपुरी आणि फतेहपूर यांसारख्या महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. 

पुणे – प्रयागराज विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार? 

ही गाडी पुण्यातून 27 आणि 31 डिसेंबर रोजी सोडली जाणार आहे. पुण्यातून रात्री आठ वाजेच्या सुमारास ही गाडी सोडली जाईल आणि तिसऱ्या दिवशी ही गाडी प्रयागराज येथे पोहोचणार आहे. या विशेष गाडीला राज्यातील आठ महत्त्वपूर्ण स्टेशनवर थांबा मंजूर करण्याची घोषणा मध्य रेल्वे कडून करण्यात आली आहे.

ही गाडी हडपसर, दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगांव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी, उरई, कानपूर सेंट्रल, गोविंदपुरी आणि फतेहपूर यांसारख्या महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा घेईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.