इन्फोसिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी…! फ्रेशर्स उमेदवारांना पण मिळणार नोकरी, ‘या’ पदासाठी मिळणार 1,75,000 रुपये महिना

Infosys Job : नोकरीच्या शोधात असणाऱ्या नवयुवक तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी इन्फोसिस सारख्या जागतिक कंपनीत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी अधिकार ठरणार आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी गेले काही महिने विशेष त्रासदायक राहिले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक आयटी कंपन्यांनी नोकर कपात केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे आयटेक क्षेत्रात नोकर कपातीचे मोठे संकट उभे राहिले आहे.

गुगल , अमेझॉन , फेसबुक अशा अनेक कंपन्यांनी अलीकडील काही महिन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने नोकर कपात केली आहे. मात्र ज्या तंत्रज्ञानाने नवयुवक तरुणांच्या नोकऱ्या खाल्ल्यात आता तेच तंत्रज्ञान नवीन नोकऱ्या तयार करत आहेत.

हो बरोबर वाचताय तुम्ही एआय मुळे आता नवीन नोकऱ्या तयार झाल्या आहेत. आयटी सेक्टर मधील दिग्गज कंपनी इन्फोसिस ने ऑफ कॅम्पस नोकर भरती करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

या नोकर भरतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे इन्फोसिसच्या माध्यमातून ऑफ कॅम्पस होणाऱ्या या नोकर भरती मधून सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांना थेट 21 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर केले जाणार आहे.

इंजीनियरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स च्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. यातील काही निवडक तांत्रिक रोल साठी सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांना 7 लाख रुपये ते 21 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळणार आहे.

इन्फोसिसने आता एआय फर्स्ट हे धोरण स्वीकारले आहे आणि यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात तज्ञ असणाऱ्या उमेदवारांची कंपनीला गरज आहे आणि हेच उमेदवार भरण्यासाठी कंपनीकडून नोकर भरती काढण्यात आली आहे. 

कोणत्या पदांसाठी होणार भरती 

मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसिसच्या माध्यमातून डिजिटल स्पेशालिस्ट इंजिनियर ( ट्रेनी ) या पदासाठी भरती होणार असून या पदासाठी सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांना वार्षिक सात लाख रुपये एवढे पॅकेज ऑफर केले जाईल. स्पेशालिस्ट प्रोग्रामर L1 (ट्रेनी) ची पदे पण भरली जाणार आहेत आणि यावर सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांना 11 लाख रुपये एवढं मोठं पॅकेज ऑफर केले जाणार आहे.

स्पेशालिस्ट प्रोग्रामर L2 (ट्रेनी) पदासाठी सुद्धा भरती होणार आहे आणि या पदासाठी सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांना वार्षिक सोळा लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. स्पेशालिस्ट प्रोग्रामर L3 (ट्रेनी) या पदासाठी सिलेक्ट होणाऱ्या उमेदवारांना वार्षिक 21 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. 

कोणत्या उमेदवारांना अर्ज करता येणार

इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार वर नमूद केलेल्या पदांसाठी कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीसह ECE आणि EEE सारख्या सर्किट ब्रांचेसच्या BE, BTech, ME, MTech, MCA आणि MSc पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत.

मात्र असे असले तरी उमेदवारांनी याबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक असेल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या चालू आर्थिक वर्षात कंपनीकडून एकूण वीस हजार फ्रेशर्सला नोकरी दिली जाणार आहे. आतापर्यंत कंपनीने एकूण बारा हजार फ्रेशर भरले आहेत आणि उर्वरित 8000 तरुणांना देखील लवकरच नोकरी दिली जाणार आहे.