Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस नंतर वंदे भारत एक्सप्रेसला देशात सर्वाधिक पसंती मिळाली.
आजच्या घडीला ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय ट्रेन म्हणून ओळखले जाते. या गाडीला शताब्दी आणि राजधानी पेक्षा अधिक पसंती मिळत आहे. यामुळे शासनाच्या माध्यमातून या गाडीचे नेटवर्क वाढवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

सध्या स्थितीला देशात 160 वंदे भारत ट्रेन सेवा देत आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात सद्यस्थितीला 12 जोडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत आणि या गाड्यांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.
दरम्यान राज्यात सुरू असणाऱ्या एका महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते नागपूर या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्यात आला असून हे नव वेळापत्रक उद्यापासून सक्रिय होणार आहे.
उद्या 26 डिसेंबर 2025 पासून पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. खरे तर पुणे – अजनी वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवण्यात आला आहे यामुळे याच्या वेळेत पण बदल झाला आहे आणि या निर्णयाचा प्रवाशांना सर्वाधिक फायदा होईल.
रेल्वेच्या नव्या निर्णयामुळे प्रवास कालावधी कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे – अजनी वंदे भारत एक्सप्रेस म्हणजेच गाडी क्रमांक 206101 अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकावर अंदाजे दहा मिनिटे लवकर पोहोचणार आहे.
तसेच या स्थानकावरून ही गाडी दहा मिनिटे आधी सोडली जाणार आहे आणि म्हणून ही गाडी वर्धा स्थानकात देखील नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचणार आहे.
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे अकोला, बडनेरा आणि वर्धा या तीन स्थानकावरील पुणे – अजनी वंदे भारत एक्सप्रेसच्या आगमनाची आणि सोडण्याची वेळ पूर्वीपेक्षा दहा मिनिटे आधी करण्यात आली आहे.
पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्थानकातून सकाळी 06:25 मिनिटांनी आणि अजनी स्थानकातून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सोडली जाते. अजनी येथून सोमवारी आणि पुणे येथून गुरुवारी ही गाडी सुटत नाही.