Zodiac Sign : आज पासून काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. खरे तर वैदिक ज्योतिष शास्त्रात बारा राशी, 9 ग्रह तसेच नक्षत्रांना विशेष महत्त्व असते. ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते.
दरम्यान जेव्हा ग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा समस्त मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. काही ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन काही लोकांसाठी फायद्याचे ठरते तर काही लोकांना यामुळे नुकसान सहन करावे लागते.

दरम्यान नवग्रहातील एका महत्त्वाच्या ग्रहाने अलीकडेच नक्षत्र परिवर्तन केले आहे आणि यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. मंगळ ग्रहाने काल नक्षत्र परिवर्तन केले.
हा ग्रह साहस, पराक्रम, शौर्य, ऊर्जा, क्रोध आणि भूमीचा कारक मानला जातो आणि सहाजिकच याच्या नक्षत्र परिवर्तनाचा अनेक लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळू शकतो. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. सध्या मंगळ धनु राशीत विराजमान असून त्याने 25 डिसेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शुक्र ग्रहाच्या स्वामित्वाखालील पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे.
आम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्वाषाढा नक्षत्राचा स्वामी शुक्र असल्याने या काळात काही लोकांना भौतिक सुख, संपत्ती, प्रेमसंबंध आणि आर्थिक बाबींवर सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे.
जोवर मंगळ ग्रह या नक्षत्रात असेल तोवर या लोकांचे मंगल होईल अशी आशा आहे. आता आपण मंगळ ग्रहाच्या या नक्षत्र परिवर्तनाचा नेमका कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होतोय याबाबत माहिती पाहूयात.
या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
मकर : ह्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरेल. अडकलेली कामे मार्गी लागतील, आत्मविश्वास वाढेल आणि पदोन्नतीचे योग निर्माण होतील. कुटुंबासोबत प्रवासाचा योग येऊ शकतो. सुख-समृद्धीत वाढ होईल.
वृश्चिक : ह्या राशीसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायी ठरणार आहे. मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात शुभकार्य होण्याची शक्यता असून एकूणच हा काळ सकारात्मक आणि प्रगतीचा ठरेल.
वृषभ : ह्या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे हे नक्षत्र परिवर्तन विशेष शुभ मानले जात आहे. या काळात दीर्घकाळ चाललेल्या समस्या दूर होतील. मानसिक ताणतणाव कमी होईल आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि शत्रूंवर मात करता येईल.
मिथुन : ह्या राशीसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत अनुकूल ठरेल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.