मुंबई – बेंगलोर द्विसाप्ताहिक गाडीला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी ! कधीपासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस? समोर आली नवीन अपडेट

Mumbai Bangalore Express : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही मुंबई ते बेंगलोर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच नव्या एक्सप्रेस ट्रेन ला मंजुरी दिली असून आता या मंजूर झालेल्या ट्रेन बाबत नव अपडेट समोर आल आहे.

खरंतर रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई – बेंगलोर द्विसाप्ताहिक रेल्वे गाडीला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच सुरू होणार अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात ही गाडी या वर्षी सुरु होणार नाहीये.

बंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) नवीन एक्स्प्रेस ट्रेन नव्या वर्षातच सुरू होणार आहे. या गाडीमुळे मिरज व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मुंबईत व बेंगलोरला जाण्यासाठी नवा विकल्प उपलब्ध होणार आहे.

खरे तर या नव्या रेल्वे गाडीचा प्रस्ताव अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला. ही गाडी 17 डब्यांची राहणार आहे आणि आता या गाडीला नव्या वर्षात हिरवा झेंडा दाखवला जाईल अशी माहिती समोर येत आहे.

ही गाडी द्विसाप्ताहिक म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे. दरम्यान आता आपण या नव्या एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्टेशनवर थांबा घेणार याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार नव्या एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक ?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई – बेंगलोर नवीन एक्सप्रेस ट्रेन नव्या वर्षात सुरू होणार असून ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रविवारी आणि बुधवारी रात्री आठ वाजून 35 मिनिटांनी सोडली जाणार आहे.

तसेच बेंगलोर मुंबई एक्सप्रेस ट्रेन शनिवारी आणि मंगळवारी रात्री साडेदहा वाजता बेंगलोर स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय.

कोण कोणत्या स्थानकावर थांबणार नवीन एक्सप्रेस?

मुंबई – बेंगलोर नवीन एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा घेत जाणार आहे. या 2026 मध्ये सुरू होणाऱ्या नव्या एक्सप्रेस गाडीला दावणगेरे, हुबळी, धारवाड, बेळगावी, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण व ठाणे या महत्त्वाच्या स्टेशनवर रेल्वे मंत्रालयाकडून थांबे मंजूर करण्यात आले आहेत.