Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य शासन लवकरच मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहे. खरे तर सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे.
राज्यात अलीकडेच नगरपंचायत आणि नगरपरिषद म्हणजेच नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी शांत झाली. नगरपरिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले.

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुद्धा जाहीर केला आहे. महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होईल आणि त्यानंतर 16 जानेवारी रोजी याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींचा कौल मिळवण्यासाठी फडणवीस सरकार केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची दाट शक्यता आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की लाडक्या बहिणींना आता केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीला ही मुदत 18 नोव्हेंबर होती मात्र त्या मुदतीत अनेकांचे केवायसी झाली नाही आणि म्हणूनच शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी प्रक्रियेला मुदत वाढ देण्याचा एक मोठा निर्णय घेतला.
म्हणजेच केवायसीसाठी अजून महिलांकडे पाच दिवसांचा काळ बाकी आहे मात्र अजूनही लाखो महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि म्हणूनच फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना केवायसीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळू शकते असा अंदाज आहे.
नक्कीच सरकारने केवायसीला मुदतवाढ दिली तर महिलांना दिलासा मिळणार आहे, यामुळे नव्या वर्षात सुद्धा केवायसी करता येणे शक्य होईल. मात्र अजून या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेले नाही.
महिला व बालविकास विभागाकडून याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे आता केवायसीला मुदतवाढ मिळते की नाही ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आधी तीन महिन्यांचे पैसे मिळू शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे 14 जानेवारीच्या आधी मिळतील असा अंदाज आहे.