शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! जानेवारी महिन्यात शाळा १० दिवस बंद राहणार , कारण काय?

Maharashtra Schools : शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. २०२६ चा पहिला महिना अर्थातच जानेवारी महिना विचार करण्यासाठी फारच आनंदाचा राहणार आहे.

२०२५ वर्ष संपत आले असून अवघ्या काही दिवसांत नवीन वर्ष २०२६चे आगमन होणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

कारण जानेवारी २०२६ महिन्यात शाळांना भरपूर सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच मज्जा होणार आहे. सलग सुट्ट्या, सण-उत्सव आणि वीकेंड यांचा योग आल्यामुळे हा महिना फिरण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि अभ्यासासोबतच आराम करण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे.

जानेवारी महिन्यात नववर्ष, मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन यांसारख्या महत्त्वाच्या सणांमुळे आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे शाळा अनेक दिवस बंद राहणार आहेत. याशिवाय शनिवार-रविवारची नेहमीची सुट्टी धरली, तर काही शाळांमध्ये जवळपास १० दिवसांपर्यंत शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही थोडा निवांत वेळ मिळणार आहे.

जानेवारी २०२६ मधील प्रमुख शालेय सुट्ट्यांमध्ये १ जानेवारी रोजी नववर्षाची सुट्टी असेल. २ जानेवारीला नववर्ष आणि मन्नम जयंतीनिमित्त काही राज्यांमध्ये शाळा बंद राहणार आहेत. ३ जानेवारीला हजरत अली यांचा जन्मदिन असल्याने सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे.

१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती, १४ जानेवारीला मकर संक्रांत तर १५ जानेवारीला उत्तरायण पुण्यकाल, पोंगल आणि मकर संक्रांत यानिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.

१६ जानेवारीला तिरुवल्लुवर दिवस आणि १७ जानेवारीला उझावर थिरुनाल या प्रादेशिक सणांमुळे काही भागांत शाळा बंद राहतील. २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन ही राष्ट्रीय सुट्टी असेल.

याशिवाय जानेवारी महिन्यातील शनिवार आणि रविवार धरले, तर सुट्ट्यांची संख्या आणखी वाढते. अनेक शाळांमध्ये शनिवार-रविवार पूर्ण सुट्टी असते, तर काही शाळांमध्ये शनिवारी अर्धा दिवस असतो. त्यामुळे एकूणच जानेवारी महिना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी ठरणार आहे.

या सुट्ट्यांचा उपयोग विद्यार्थी सहली, कौटुंबिक पर्यटन, अभ्यासाची उजळणी किंवा छंद जोपासण्यासाठी करू शकतात. त्यामुळे नववर्षाची सुरुवातच विद्यार्थ्यांसाठी उत्साहात आणि आनंदात होणार असल्याचे चित्र आहे.