MPSC Notification : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे नव्या वर्षाच्या आधीच नवीन जाहिरात जारी करण्यात आली आहे.
एमपीएससी मार्फत जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार या पदभरती अंतर्गत आयोगाकडून गट अ आणि गट ब च्या विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या पदभरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.

खरं तर राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. एमपीएससीच्या परीक्षेसाठी राज्यातील लाखो नवयुवक तरुण तरुणी अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत.
दरम्यान जर तुम्ही पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि एमपीएससीच्या गट अ किंवा गट ब च्या भरतीची आतुरतेने वाट पाहत असाल तर नक्कीच ही तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे. दरम्यान आता आपण एमपीएससीच्या या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती जागांसाठी होणार भरती
एमपीएससीने जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार या पदभरती अंतर्गत ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या 87 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सामान्य प्रशासन विभाग तसेच महसूल विभाग आणि वन विभागातील रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जातील अशी माहिती नोटिफिकेशन मधून समोर आली आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती ?
उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी (गट-अ) – 14
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ) – 32
सहायक गट विकास अधिकारी गट-ब – 30
उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब – 4
पशुवैद्यकीय अधिकारी गट-अ – 8
कशी राबवली जाणार भरती प्रक्रिया
नेहमीप्रमाणे एमपीएससीची भरती प्रक्रिया तीन टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिला टप्पा पूर्व परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा राहील मुलाखतीचा. यातील पूर्व परीक्षेचे गुण फक्त मुख्य परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. म्हणजेच पूर्व परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांनाच पुढे मुख्य परीक्षा देता येणार आहे.
पूर्व परीक्षा कधी होणार
31 मे 2025 रोजी गट अ आणि गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान या संयुक्त पूर्व परीक्षा तर निवडलेल्या उमेदवारांना स्वातंत्रपणे नंतर मुख्य परीक्षेची तारीख सांगितली जाईल. संयुक्त पूर्व परीक्षा 38 जिल्हा केंद्रावर होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत
ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 31 डिसेंबर पासून अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचवेळी शुल्क भरण्यासाठी ची मुदत 23 जानेवारी राहणार आहे.