Pune Metro News : पुणे शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महा मेट्रो कडून पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत आणि आता पुण्याला येत्या काळात तिसऱ्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.
पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. हा पुण्यातील असा पहिला प्रकल्प आहे जो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर राबवला जातोय.

दरम्यान या प्रकल्पाबाबत आता एक नव अपडेट समोर आल आहे. खरे तर हा मेट्रो मार्ग मार्च 2026 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होणार अशा चर्चा होत्या. खरंतर या प्रकल्पाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा मेट्रोमार्ग मार्च 2026 पर्यंत सुरू व्हावा म्हणून या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2025 ची डेडलाईन दिली होती. मात्र आता डिसेंबर संपण्यात आहे आणि अजूनही या प्रकल्पाचे 9% काम बाकी आहे.
यामुळे या मेट्रो मार्गासाठी पुणेकरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागू शकते असे बोलले जात आहे. या प्रकल्पाचे आणखी 9% काम बाकी आहे म्हणूनच पुणेकरांना अतिरिक्त सहा महिने प्रतीक्षा करावी लागू शकते.
म्हणजेच हा मार्ग पूर्णपणे सुरू होण्यासाठी सप्टेंबर 2026 पर्यंत वाट पहावी लागू शकते. या मार्गावरील काही स्थानकांचे काम अपूर्ण असल्याने हा मार्ग आता उशिराने प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
विशेष म्हणजे 2026 मध्ये या मार्गावर मेट्रो सुरु झाली तरी सुद्धा ती पूर्ण क्षमतेने धावणार नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाच्या माध्यमातून ज्या स्थानांची कामे राहिलेली आहेत ती स्थानके वगळून हा मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
या मार्गावर एकूण 23 स्थानके विकसित केली जात आहेत पण त्यापैकी 11स्थानकांचे काम बाकी असून या संबंधित स्थानकांना वगळून हा मार्ग 2026 च्या प्रारंभी सुरू करण्याची योजना आता प्रशासनाने आखलेली आहे.
हा मेट्रो मार्ग 23.3 किलोमीटर लांबीचा आहे. याचे काम 2021 मध्ये सुरू झाले होते आणि या प्रकल्पासाठी मार्च 2025 मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत काम झाले नाही म्हणून मुदत वाढवून मिळाली. पण आता मार्च 2026 पर्यंत देखील हा पूर्ण मेट्रो मार्ग सुरू होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
अद्याप ज्या स्थानकांची कामे पूर्ण झालेली नाहीत ती स्थानके वगळून 2026 च्या सुरुवातीला हा मेट्रो मार्ग सुरू होण्याचे शक्यता मात्र आहे. यामुळे आता प्रशासन या मेट्रो मार्ग प्रकल्पाच्या उद्घाटनाबाबत नेमका काय निर्णय घेते हे पाहणे खरंच उत्सुकतेचे राहणार आहे.