Jio Recharge Plan : तुमच्याकडे पण जिओचे सिम आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. तुम्ही जिओचे कस्टमर असाल आणि तुमचा रिचार्ज संपला असेल तर आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा एका स्वस्त प्लानची माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे बरेच पैसे वाचतील.
खरेतर, सध्या भारतात टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. विशेषता एअरटेल आणि जिओ या दोन कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जिओच्या एंट्री नंतर एअरटेल ला मोठा फटका बसला होता मात्र आता एअरटेल ने सुद्धा जबरदस्त वापसी केली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये एअरटेलच्या कस्टमरची संख्या प्रचंड वाढली आहे. शिवाय एअरटेल आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्वस्त प्लॅन आणत आहे. जिओ सुद्धा असेच काही स्वस्त प्लॅन आपल्या ग्राहकांना ऑफर करते. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन आपल्याला पाहायला मिळतं आहेत.
Jio कंपनी महागड्या प्लॅन सोबतच काही परवडणारे प्लॅन सुद्धा ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. आज आम्ही अशाच एका प्लॅनबद्दल माहिती सांगणार आहोत. हा प्लॅन कमी किमतीत येतो आणि जवळपास 28 दिवसांची व्हॅलिडीटी देतो. या प्लॅन ची किंमत शंभर रुपयांपेक्षा कमी आहे.
कोणता आहे तो प्लॅन?
जिओच्या रिचार्ज प्लॅनच्या यादीमध्ये 91 रुपयांचा प्लॅन समाविष्ट आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडीटी सह ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात कॉलिंग, डेटा आणि एसएमएससारखे फायदे मिळतात. जिओच्या या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा मिळतो. पण, हा डेटा डेली बेसिस वर मिळणार आहे म्हणजेच एकाच वेळी तीन जीबी डेटा वापरता येणार नाही. कंपनी दररोज 100 एमबी डेटा देणार आहे.
तसेच, कंपनी या प्लॅनने रिचार्ज केल्यास ग्राहकांना अतिरिक्त 200 एमबी डेटा देखील देत आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 2.8 जीबी डेटा आणि 200 एमबी अतिरिक्त डेटा मिळतो. ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 50 एसएमएसचा बेनिफिट सुद्धा मिळतो.
शिवाय डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, वापरकर्त्यांना 64Kbps च्या वेगाने डेटा मिळेल. लक्षात ठेवा की हा जिओ प्लॅन सर्व वापरकर्त्यांसाठी नाही. तर, कंपनीने हा प्लॅन जिओफोन वापरकर्त्यांसाठी लाँच केला आहे. म्हणजे जर तुम्ही जिओ फोन युजर असाल तर या प्लॅनने रिचार्ज करू शकता.
नॉन जिओ फोन युजरसाठीचा स्वस्त प्लॅन
दरम्यान, सामान्य ग्राहकांसाठी म्हणजेच स्मार्टफोन यूजरसाठी सुद्धा जिओने 189 रुपयांचा स्वस्त प्लॅन काढला आहे. या प्लॅनमध्ये डेली दोन जीबी डेटा, 28 दिवस व्हॅलिडीटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 300 sms चा बेनिफिट मिळतो. हा प्लॅन नॉन जिओ फोन यूजर साठी म्हणजेच स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन आहे.