सावधान ! 2026 ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार कष्टाचे, बुध ग्रहाची केतूच्या नक्षत्रात होणार इंट्री

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रहांना, बारा राशींना आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व असते. ज्योतिष शास्त्र असे सांगते की ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात.

दरम्यान जेव्हा ग्रहांचे राशी परिवर्तन होते किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. काही वेळा राशी किंवा नक्षत्र परिवर्तनाचा मानवी जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो तर काही वेळा याचा नकारात्मक प्रभाव सुद्धा पाहायला मिळतो.

दरम्यान या वर्षाच्या एंडिंगला अशीच एक घटना घडणार आहे ज्यामुळे 2026 हे वर्ष सुरुवातीच्या टप्प्यात काही राशीच्या लोकांसाठी अधिक कष्टदायी ठरण्याची शक्यता आहे.

ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षाच्या शेवटी अर्थात 29 डिसेंबर 2025 रोजी, ग्रहांचा राजकुमार बुध, नक्षत्र परिवर्तन करण्यास सज्ज झाला आहे. मात्र यावेळी बुधदेवता केतूच्या अधिपत्याखालील असणाऱ्या नक्षत्रात म्हणजेच मूल नक्षत्रात प्रवेश करेल.

बुध 7 जानेवारीपर्यंत या नक्षत्रात राहील. दरम्यान जोपर्यंत बुध ग्रह या नक्षत्रात राहील तोपर्यंत काही राशीच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागू शकतो. शास्त्रांमध्ये केतूला राक्षस असं म्हणतात आणि ज्योतिषशास्त्रात पापी ग्रह मानले जाते.

ज्योतिषी म्हणतात की, या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशीच्या लोकांना काही संकटांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान आता आपण 2026 ची सुरुवात कोणत्या राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरणार आणि या राशीच्या लोकांनी काय काळजी घ्यायला हवी याचाच आढावा या लेखात घेणार आहोत.

कन्या : बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशीच्या लोकांना फटका बसू शकतो. गैरसमजांमुळे नातेसंबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पैसे उधार घेतल्याने मोठा वाद होऊ शकतो.

विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. शिक्षण आणि करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. घरगुती समस्यांमुळेही ताण येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या खर्चाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. तुमचा बँक बॅलन्स राखणे हे एक मोठे आव्हान ठरू शकते.

कर्क : ह्या राशीच्या लोकांसाठी पण नव्या वर्षाचे सुरुवातीचे काही दिवस कठीण जाऊ शकतात. जे लोक व्यवसायात सक्रिय आहेत त्यांना थोडेसे नुकसान सहन करावे लागू शकते, थोडा नफा कमी होऊ शकतो. व्यवसायिकांच्या इनकम सोर्सवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कठोर मेहनत घेऊन सुद्धा या काळात अपेक्षित यश मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ थोडा आव्हानाचा राहणार आहे. विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे. त्यांचे मन विचलित राहील आणि अभ्यासावर परिणाम होईल असे म्हटले जात आहे.

कुटुंबात देखील कलाहाची स्थिती राहू शकते. पालकांसोबत मतभेद होण्याची शक्यता नाकारून चालत नाही. या कालावधीत या लोकांनी जिभेवर मध ठेवावे, अर्थात संयमाने बोलावे आणि वागावे.

आपल्या बोलण्याने किंवा वागण्याने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी नाहीतर नातेसंबंध खराब होऊ शकतात. नोकरी व्यवसाय आणि शिक्षणात देखील आपल्या वाणीमुळे मोठ आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

वृषभ : अति घाई संकटात नेई ही गोष्ट लक्षात ठेवून या लोकांनी या काळात आपल्या कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण की घाईघाईने केलेली कामे या लोकांसाठी नुकसानदायक ठरू शकतात.

या लोकांना कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विनाकारण एखाद्या गोष्टीविषयीची चिंता या लोकांचे मन विचलित करू शकते. आर्थिक दृष्ट्या हा काळ आव्हानाचा राहण्याची शक्यता आहे.

यामुळे पैशांच्या कामांमध्ये सावधानता बाळगणे हेच या लोकांसाठी फायद्याचे ठरेल. नजर हटी दुर्घटना घटी या पद्धतीने पैशांच्या बाबतीत जर या लोकांनी कानाडोळा केला तर यांना नुकसान सहन करावे लागू शकते. या काळात कोणीतरी या लोकांचे कष्टाचे पैसे हिरावण्याची शक्यता सुद्धा आहे.

हे लोक फसवणुकीला बळी पडू शकतात आणि यामुळे यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या लोकांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक कामांसाठी तज्ञांकडून सल्ला घ्यावा जेणेकरून त्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही. विद्यार्थ्यांनी या काळात फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष ठेवावे तसेच शिक्षक आणि वरिष्ठ लोकांसोबत आदराने आणि प्रेमाने वागावे.