लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! मंत्री अदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आलीये. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

खरंतर लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली एक महत्त्वकांक्षी योजना असून याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यात आला. तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांना एकही रुपया मिळालेला नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्याची लाभार्थ्यांकडून वाट पाहिली जात आहे.

दुसरीकडे या योजनेच्या लाभासाठी आता केवायसी ची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाने केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान आता याच केवायसी प्रक्रिये बाबत मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर माहिती दिली आहे.

 मंत्री तटकरे यांनी काय सांगितले?

 खरे तर लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यांची प्रतीक्षा आहे. आनंदाची बाब अशी की मीडिया रिपोर्ट्समध्ये या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते मिळणार अशी माहिती समोर आली आहे.

मकर संक्रांतीच्या आधी म्हणजेच 14 जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींना तीनही महिन्यांचे पैसे दिले जाऊ शकतात असा दावा केला जातोय. अर्थात अजून सरकारने याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही पण प्रसारमाध्यमांमध्ये तीन महिन्यांच्या हप्ते सोबत मिळणार अशा चर्चा सुरू झाल्याने लाडक्या बहिणीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

अशातच आता मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना मुदतीत केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे.

मंत्री तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “ लाडक्या बहिणींनो…मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे 4 दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !

याचाच अर्थ केवायसी प्रक्रियेसाठी कदाचित शासनाकडून मुदतवाढ मिळणार नाही. यामुळे लाडक्या बहिणींना या मुदतीत केवायसी करावी लागणार आहे नाहीतर त्यांना योजनेतून वगळले जाऊ शकते.