नवीन वर्ष सुरू होण्याआधी अहिल्यानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway News : नवीन वर्ष सुरू होण्याआधीच अहिल्यानगर पुणे नागपूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर सध्या नाताळ तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण बाहेरगावी पर्यटनासाठी जात आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण तीर्थक्षेत्रावर जाण्याचा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान जर तुमचाही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेरगावी जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी रेल्वे कडून एक आनंदाची बातमी हाती आली आहे

. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने हडपसर ते नागपूर आणि पुणे ते नागपूर अशा दोन विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही गाड्या अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा घेणार आहेत. यामुळे या गाड्यांचा नागपूर पुणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

पुणे ते नागपूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्या मोठ्या उपयुक्त ठरतील असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला असून या विशेष गाड्यांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण या दोन्ही विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक तसेच या गाड्या कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याचीच माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे राहणार हडपसर – नागपूर विशेष गाडीचे वेळापत्रक आणि थांबे?

मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून हडपसर ते नागपूर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार असून ही विशेष गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून 27 29 31 डिसेंबर 2025 आणि 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी अकरा वाजून 25 मिनिटांनी हडपसर येथे पोहोचणार आहे.

तसेच हडपसर येथून ही गाडी 28, 30 डिसेंबर 2025 आणि एक जानेवारी व चार जानेवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता हे गाडी नागपूरला पोहोचणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या विशेष गाडीला अजनी, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, पाचोरा, बेलापूर, अहमदनगर व दौंड कॉर्ड लाइन अशा प्रमुख स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे.

पुणे – नागपूर विशेष गाडीचे वेळापत्रक आणि थांबे?

27, 29, 31 डिसेंबर 2025 आणि 3 जानेवारी 2026 रोजी पुणे – नागपूर विशेष गाडी पुण्यातून रात्री साडेआठ वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी दोन वाजेच्या सुमारास नागपूरला पोहोचणार आहे. तसेच नागपूर येथून ही गाडी 28, 30 डिसेंबर 2025 आणि 1 जानेवारी व 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पावणे बारा वाजेच्या सुमारास ही गाडी पुण्याला पोहोचेल. या गाडीला मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा व अजनी अशा स्टेशनवर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.