1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 22 हजार रुपयांचे व्याज ! सरकारी बँकेची एफडी योजना ठरणार गुंतवणूकदारांसाठी फायद्याची

FD Scheme : रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. 2025 मध्ये सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा मिळावा यासाठी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली असून या निर्णयामुळे देशभरातील अनेक बँकांनी होम लोन सहित सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर कमी केले आहेत.

दरम्यान, या निर्णयाचा जसा फायदा झाला तसाच तोटा सुद्धा झाला आहे. कारण की रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय झाल्यानंतर एफडीचे व्याजदर सुद्धा कमी करण्यात आले आहे. अनेक बँकांनी आपल्या एफडी योजनांचे व्याजदर घटवले असून यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, अशी स्थिती असली तरी देखील देशातील काही बँका आजही गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याज देत आहेत आणि आज आपण अशाच एका बँकेची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

आरबीआयच्या रेपो रेटचा एफडी व्याजदरांवर परिणाम होतो

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया जेव्हा केव्हा रेपो रेट वाढवते तेव्हा फिक्स डिपॉझिटचे व्याजदर सुद्धा वाढते. रेपो रेट वाढीचा निर्णय झाला की बँकांच्या माध्यमातून एफडी व्याजदरात सुद्धा थोडी वाढ केली जाते. त्याचवेळी जेव्हा आरबीआयकडून रेपो रेट कमी केले जातात तेव्हा एफडीच्या व्याज दरात कपात होण्याची शक्यता असते.

यंदा आरबीआयने रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली असून या निर्णयामुळे देशभरातील बँकांनी 2025 मध्ये फिक्स डिपॉझिटचे व्याजदर घटवले आहे. दरम्यान 2026 मध्ये देखील एफडीच्या व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी आजही सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगले व्याज देते. दरम्यान आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अशा एका एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत जिथे एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना जवळपास 22 हजार रुपये फक्त व्याज म्हणून मिळतात.

ही योजना ठरणार फायद्याची

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ग्राहकांना आपल्या सोयीनुसार सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत फिक्स डिपॉझिट करता येते. एफडी मध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर सद्यस्थितीला बँकेकडून तीन टक्क्यांपासून ते 6.80% पर्यंतचे व्याज दिले जात आहे. म्हणजे एफडीच्या कालावधीनुसार व्याजदर लागू होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून सर्वाधिक व्याज आपल्या विशेष FD योजनांवर दिले जात आहे

. बँक 444 दिवसांची आणि 555 दिवसांची विशेष FD योजना चालवते ज्यावर सामान्य ग्राहकांना 6.30% दराने आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 6.80% दराने व्याज मिळते. याशिवाय आपल्या नियमित एफडी योजनांवरदेखील बँकेकडून चांगले व्याज दिले जात आहे. तीन वर्षांच्या नियमित एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सद्यस्थितीला सहा टक्के आणि सिनिअर सिटीजन ग्राहकांना 6.50% दराने व्याज दिले जात आहे.

एक लाखांची गुंतवणूक देणार 22 हजाराचे व्याज

एखाद्याने जर या बँकेत तीन वर्षांसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर एक लाख 19 हजार 562 रुपये मिळणार आहेत. अर्थात 19 हजार 562 रुपये सदर सामान्य ग्राहकाला व्यास स्वरूपात रिटर्न मिळतील. त्याचवेळी जर तीन वर्षांच्या एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 21 हजार 341 रुपयांचे व्याज मिळणार आहे.