चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चिंताजनक ! चांदीच्या किमतीत 60 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता, वाचा सविस्तर…

Silver Price : 2025 आता अंतिम टप्प्यात आले आहे, येत्या काही तासांनी नव्या वर्षाला सुरुवात होईल. दरम्यान नवीन वर्ष सुरू होण्याआधी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर 2025 हे वर्ष या दोन्ही मौल्यवान धातूंच्या गुंतवणूकदारांसाठी खास ठरले आहे. चांदीच्या किमती एका नव्या उंचीवर पोहोचल्या आहेत आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना 2025 मध्ये अगदीच थक्क करणारे रिटर्न मिळाले आहेत. तज्ञ लोकांना देखील चांदीच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतील अशी आशा नव्हती मात्र 2025 मध्ये चांदी दोन लाखाच्या पुढे गेली आणि यामुळे सर्वजण हैराण झालेत.

पण आता चांदीच्या दरांबाबत एक धक्कादायक भविष्यवाणी करण्यात आली आहे. चांदीची किंमत किलोमागे दोन लाख रुपयांच्या वर गेल्यानंतर आता एक नवीन अंदाज समूहाला आहे ज्यामध्ये चांदीच्या दरवाढीचा हा फुगा येत्या काळात फुटू शकतो असे बोलले जात आहे. चांदीच्या किमतीत जवळपास 60 टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही चांदीमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा येत्या काळात चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर नक्कीच आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.

सोमवारी चांदीच्या किमतीने प्रथमच अडीच लाखांचा टप्पा गाठला मात्र काही तासातच चांदीच्या किमतीत तीस हजार रुपयांची मोठी घसरण झाली. चांदीची किंमत दोन लाख 54 हजार 174 रुपयांवरून थेट 2.22 लाख रुपयांवर आली. यामुळे गुंतवणूकदारांमधील अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढली आणि अशी सगळी परिस्थिती असतानाच आता येत्या काळात चांदीच्या किमती 50 ते 60 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात असा खळबळ जनक अहवाल समोर आला आहे आणि यामुळे मार्केटमध्ये प्रचंड खळबळ पाहायला मिळत आहे.

पेस 360 चे तज्ज्ञ अमित गोयल यांनी येत्या काळात चांदीच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. गोयल म्हणतात की चांदीच्या किमती सध्याच्या पातळीवर आहेत त्याचा वास्तवाशी कोणताच संबंध दिसत नाही. चांदीचे भाव हे सामान्यतः डॉलरच्या हालचालींवर निर्भर असतात मात्र सध्याच्या स्थितीला चांदीच्या बाबतीत हा नियम लागू होत नसल्याचे चित्र आहे. तज्ञ सांगतात की चांदीच्या दरात सध्याची तेजी आहे ती अगदीच 2000 मध्ये आलेल्या डॉट कॉम संकटासारखी आणि 2008 मधील कच्च्या तेलाच्या अवास्तव दरवाढीसारखी भासत आहे.

तज्ञांनी अस सांगितलं की सध्या चांदीची मागणी वाढली असल्याने दर वाढत नाही तर सट्टेबाजीमुळे भाव वाढत आहे. चीनने चांदीच्या निर्यातीवर बंदी घातली ही एक साधी आणि सोपी बातमी पण या बातमीला एवढ्या मोठ्या प्रमाणात हाईक देण्यात आली की चांदीच्या किमतीबाबत हा सर्व बबल तयार झाला आहे. मात्र आता हा फुगा फुटणार अशा बातम्या समोर येत आहेत. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, फेब्रुवारीपर्यंत चांदीचा भाव 100 डॉलरपर्यंत जाऊ शकतो. विशेष म्हणजे हा चांदीचा उच्चांकी ठरेल.

एकदा चांदीच्या किमती या रेंज पर्यंत पोहोचल्यात की तिथून मग घसरण सुरू होणार आहे. या किमतीत साधारणता 50 ते 60 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. थोडक्यात चांदीचा हायेस्ट भाव अडीच लाख रुपये पकडला तर चांदीच्या किमतीत येत्या काळात दीड लाखांपर्यंत कमी होऊ शकतात. अर्थात किलोमागे एक लाख रुपयांची घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण ही घसरण एकाच वेळी होणार का ? तर नाही टप्प्याटप्प्याने ही घसरण होणार आहे. पुढील एक – दीड वर्षात चांदीच्या किमतीत टप्प्याटप्प्याने घसरण होईल असा अंदाज आहे.