नाशिक – अक्कलकोट सहा पदरी महामार्गाला शासनाची मंजुरी ! अहिल्यानगरसह ‘या’ चार जिल्ह्यांना महामार्गाचा फायदा

Maharashtra Expressway : नवीन वर्ष सुरू होण्याआधीच केंद्रातील सरकारकडून महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अर्थातच 31 डिसेंबरला राज्यातील एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली आहे आणि यामुळे राज्यातील पायाभूत विकासाला गती मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, काल 31 डिसेंबर 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली.

वर्षाच्या शेवटी संपन्न झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीत नाशिक- सोलापूर- अक्कलकोट ग्रीनफिल्ड एक्सेस वे उभारण्याला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. आता या निर्णयाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

या प्रकल्पामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक आधुनिक होईल असा विश्वास व्यक्त होतोय आणि या महामार्ग प्रकल्पामुळे राज्यातील चार महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

खरंतर हा महामार्ग 374 किलोमीटर लांबीचा राहणार आहे आणि यासाठी जवळपास 19142 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. विशेष म्हणजे दोन वर्षांच्या कालावधीत या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडण्यासाठी सुरत – चेन्नई हायस्पीड कॉरिडोर उभारला जातोय. याच हाय स्पीड कॉरिडॉरचा भाग म्हणजेच नाशिक – अक्कलकोट महामार्ग.

दरम्यान या महामार्गाचा राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव अन सोलापूर या चार जिल्ह्यांना थेट फायदा होणार आहे. याशिवाय इतरही काही जिल्ह्यांना या महामार्गाचा अप्रत्यक्षरीत्या फायदा होईल.

हा नवा विकसित होणारा मार्ग दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वे तसेच आग्रा – मुंबई कॉरिडोरला जोडला जाणार आहे. एवढेच नाही तर मुंबई ते नागपूर दरम्यान अलीकडेच विकसित झालेल्या समृद्धी महामार्गाला देखील नव्या प्रस्तावित महामार्गाची जोडणी करण्यात येणार आहे. म्हणजेच राज्यातील बहुतांशी जिल्हे या नव्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे थेट कनेक्ट होणार आहेत.

नव्या प्रकल्पामुळे सुरत ते चेन्नई प्रवासातील वेळ 17 तासांनी कमी होऊ शकते. हा एक सिक्स लेनचा महामार्ग असून यावर 100 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहने जाऊ शकणार आहेत.

या महामार्गाचे काम बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बांदा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर पूर्ण केल जाणार आहे. विशेष म्हणजे BOT तत्त्वावर विकसित होणारा हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.