Maharashtra Havaman Andaj : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऐन हिवाळ्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे आणि यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आज पासून नववर्षाला सुरुवात झाली आहे आणि 2026 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी मुंबईत पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वसामान्यांना सरप्राईज दिलं आणि ह्या अचानक झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आज गुरुवारी पहाटेपासून मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली.
या पावसामुळे भल्या पहाटे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि कामगारांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. या पावसाने फक्त मुंबईकरांनाच सरप्राईज दिल असं नाही तर यामुळे हवामान खाते देखील सरप्राईज आहे.
खरे तर या पावसाबाबत हवामान खात्याकडून कोणतीच माहिती समोर आली नव्हती. मुंबईत पाऊस पडणार असा कोणताच अंदाज हवामान खात्याने दिलेला नव्हता. पण आज पहाटेपासून दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये पावसाने धुवाधार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण मुंबईतील वरळी दादर सायन चेंबूर ते वाशी पर्यंत अनेक ठिकाणी पावसाची हजेरी राहिली. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा आणखी खाली आला आहे आणि थंडीची तीव्रता पण वाढली आहे. या पावसामुळे पुढील आठवडाभर मुंबईतील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी राहू शकते असा अंदाज आता दिला जातोय.
यासंदर्भात ज्येष्ठ हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी सुद्धा आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली आहे. होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत सकाळी पाच वाजेपासून पावसाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती आणि यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली.
फक्त मुंबईतच नाही तर उत्तर कोकणातील पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मध्ये देखील पावसाचे ढग पाहायला मिळाले. दरम्यान या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान तज्ञांकडून पुढील काही तास पावसाची शक्यता कायम ठेवण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस झाला असल्याची माहिती तेथील स्थानिकांकडून समोर आली आहे. यामुळे आता या अवकाळी पावसाचा कोकणातील आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मध्ये सुद्धा पावसाचे ढग जमा होते आणि तिथे पण पाऊस झाला असेल तर नक्कीच तेथील शेतकऱ्यांची सुद्धा नुकसान होणार आहे.
दरम्यान आता पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान असेल आणि कुठे पावसाचे हजेरी राहणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.