Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे स्लीपर व्हर्जन लवकरच रेल्वे प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेनची चर्चा होती आणि अखेर आता ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सुतोवाच देशाचे रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनचा रूट सुद्धा सांगितला आहे. अशा स्थितीत आता आपण ही गाडी कधीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार आणि या गाडीचा रूट कसा असणार या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार स्लीपर वंदे भारतचा रूट
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकत्ता येथील हावडा ते गुवाहाटी दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या ट्रेनचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या संदर्भात माहिती दिली.
नक्कीच, या मार्गावर स्लीपर वंदे भारत सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. गुवाहाटी ते हावडा हा प्रवास या नव्या गाडीमुळे अधिक वेगवान होईल अशी आशा आहे. खरे तर स्लीपर वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर साऱ्यांना या गाडीचा रूट कोणता असेल असा प्रश्न पडला होता आणि अखेर आता रेल्वेमंत्र्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
ही गाडी हावडा ते गुवाहाटी दरम्यान चालवली जाणार हे फायनल झाले आहे. आधी ही गाडी मुंबई ते दिल्ली या व्यस्त मार्गावर धावणार अशी आशा होती मात्र नेहमीप्रमाणे मोदी सरकारने पुन्हा धक्का तंत्राचा अवलंब करत ही गाडी हावडा ते गुवाहाटी या मार्गावर चालवण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील हजारो प्रवाशांचा भ्रमनिरास झालाय. ही गाडी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
कधी सुरू होणार नवीन ट्रेन ?
स्लीपर वंदे भारत ट्रेन येत्या पंधरा-वीस दिवसात सुरू होईल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 किंवा 19 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. अद्याप या ट्रेनच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण येत्या दोन-तीन दिवसात ही तारीख जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
तिकीट दर काय असणार?
या नव्या एक्सप्रेस ट्रेन चे तिकीट दर हे विमान प्रवासापेक्षा कमी राहील. सध्या गुवाहाटी ते हावडा असा विमान प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना 6000 रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतो. मात्र वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी 2300 रुपयांपासून ते 3600 रुपयांपर्यंतचे तिकीट दर राहील.