Soybean Rate 2026 : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात एक जानेवारी 2026 रोजी राज्यातील बाजारांमध्ये पिवळ्या सोन्याची आवक प्रचंड वाढल्याची नोंद करण्यात आली. आवकेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि याचा थेट बाजारभावावर परिणाम पाहायला मिळाला.
आज आवक वाढल्याने बाजारात सोयाबीनचा रेटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आली. खरंतर, ऑक्टोबर 2025 पासून सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. विजयादशमीपासून बाजारांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनला चांगला भाव मिळत नव्हता आणि यामुळे शेतकऱ्यांनी विक्री ऐवजी साठवणुकीला प्राधान्य दाखवले.

याचाच प्रभाव म्हणून मध्यंतरी सोयाबीनचे रेट वाढले होते. मात्र साठवणूक करूनही सोयाबीनचे रेट अपेक्षित वाढत नसल्याचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा विक्रीवर जोर दाखवला आहे आणि याचाच परिणाम म्हणून आज 1 जानेवारी रोजी राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारांमध्ये सोयाबीनची आवक वाढली. अशा स्थितीत आज आपण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील कोणत्या बाजारात सोयाबीनला कसा भाव मिळाला याचा आढावा या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमधील सोयाबीन बाजार भाव
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती : महाराष्ट्रातील या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4,355 , कमाल 6250 आणि सरासरी 5 हजार 550 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. या बाजारात आज पिवळ्या सोयाबीनची 2100 क्विंटल आवक झाली होती.
मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज पिवळ्या सोयाबीनला किमान 4000, कमाल 5,415 आणि सरासरी 5415 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाल्याची नोंद महाराष्ट्र राज्याच्या राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत साइटवर करण्यात आली.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला सरासरी 5328 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती : मराठवाड्यातील या बाजारात आज सोयाबीनला किमान 3200, कमाल 5,100 आणि सरासरी 4675 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला किमान 3650, कमाल 5050 आणि सरासरी 4350 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.