Maharashtra New Expressway : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून आणखी एक राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे जाळे या नव्या महामार्गामुळे आणखी मजबूत होणार आहे.
खरे तर सद्यस्थितीला जिल्ह्यातून तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. दरम्यान आता जळगाव जिल्ह्याला भुसावळ – चितोडगड या नव्या राष्ट्रीय महामार्गाची भेट मिळणार आहे.

या नव्या महामार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना जलद गतीने राजस्थानात पोहोचता येणार आहे. राजस्थानात महाराष्ट्र सहसंबंध देशभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी दाखल होत असतात.
राजस्थानातूनही अनेक जण कामानिमित्त तसेच नोकरी निमित्ताने महाराष्ट्रात येतात. उत्तर महाराष्ट्र, विशेषता जळगाव जिल्ह्यातील अनेक जण राजस्थानात पर्यटनासाठी जातात आणि नक्कीच या नव्या भुसावळ – चितोडगड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे सर्वसामान्य नागरिकांना तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जळगाव – अजमेर अंतर होणार कमी
महाराष्ट्रातून राजस्थान आणि राजस्थानातून उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी हा नवा प्रस्तावित महामार्ग एक सोयीचा अन सोपा पर्याय ठरणार आहे.
यामुळे महाराष्ट्र आणि राजस्थान दरम्यानचे प्रवासाचे अंतर लक्षणीय कमी होणार असून दळणवळण सुविधा आणखी मजबूत होणार आहे. नव्या नॅशनल हायवेमुळे जळगाव ते अजमेरचे अंतर कमी होईल अशी आशा आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठा गेमचेंजर ठरू शकतो.
कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी या नव्या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. या महामार्गाचा सर्वाधिक फायदा उद्योगांना आणि पर्यटनाला होईल अशी आशा आहे. दरम्यान, आता आपण या नव्या महामार्गाचा रूट कसा असेल याची माहिती जाणून घेऊयात.
कसा असणार नवीन महामार्ग ?
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ चितोडगड 347 सी हा नवा महामार्ग भुसावळ, पाल, खरगोन, धार, रतलाम, मंदसौर, निमच, चितोडगड असा राहणार आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे भिलवाडा मार्गे पुढे हा मार्ग पुष्कर आणि अजमेरला सुद्धा जोडला जाईल.
ज्याचं जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा अजमेर शरीफ पर्यंतचा प्रवास सोयीचा होणार आहे. नव्या प्रकल्पामुळे भुसावळ ते चितोडगड दरम्यानचे अंतर जवळपास दीडशे किलोमीटरने कमी होणार आहे.
या महामार्गाची महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील लांबी 36 किलोमीटर इतकी राहील आणि मध्यप्रदेशात या प्रकल्पाची लांबी 201 किलोमीटर राहणार आहे. सध्या भुसावळ होऊन चितोडगड जाण्यासाठी दोन पर्याय प्रवाशांपुढे आहेत. आता प्रवाशांना तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना सध्या बऱ्हाणपूर इंदूर नागदा जावरा मार्गे चितोडगड जाता येते.
यासोबतच यावल चोपडा शिरपूर सेंदवा रतला मार्गे सुद्धा चितोडगड ला पोहोचता येते. दरम्यान यापैकी बराणपुर मार्गे चितोडगड जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गाने जर प्रवास केला तर प्रवाशांना जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तसेच शेंदवा मार्गे चितोडगड जायचे ठरले तरीही साडेपाचशे ते सहाशे किलोमीटरचे अंतर कापावे लागते.
मात्र नवा मार्ग तयार झाल्यानंतर भुसावळ ते चितोड हा प्रवास सोपा होण्याची शक्यता आहे. नव्या मार्गामुळे 14 तासांचा प्रवास फक्त नऊ तासांवर येऊ शकतो. या नव्या राष्ट्रीय महामार्गाचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याला होणार आहे.